7th Pay Commission | कर्मचार्‍यांचा महागाई भत्ता 38 टक्के होणार ! पगारात वाढतील 27 हजार रूपये, जाणून घ्या संपूर्ण कॅलक्युलेशन

मुंबई : पोलीसनामा ऑनलाइन – 7th Pay Commission | केंद्रीय कर्मचार्‍यांना (Central Government Employees) जुलै महिन्यात चांगली बातमी मिळू शकते. मीडिया रिपोर्टनुसार एआयसीपीआय इंडेक्समध्ये दोन महिने लागोपाठ घट झाल्यानंतर मार्च 2022 मध्ये 1 पॉईंटची वाढ झाली आहे. याच कारणामुळे महागाई भत्ता Dearness Allowance (DA) वाढण्याची अपेक्षा वाढली आहे. पुन्हा एकदा महागाई भत्ता (DA Hike) चार टक्के वाढू शकतो. (7th Pay Commission)

 

सातव्या वेतन आयोगांतर्गत केंद्रीय कर्मचार्‍यांना दोनवेळा महागाई भत्ता दिला जातो. पहिल्यांदा जानेवारी आणि दुसर्‍यांदा जुलै महिन्यात दिला जातो. सरकारने अलीकडेच 3 टक्के डीए वाढवला होता. जर महागाई भत्ता जुलैमध्ये रिवाईज झाला, तर यामध्ये पुन्हा 4 टक्के वाढ दिसून येऊ शकते.

 

या दरम्यान ऑल इंडिया कंज्यूमर प्राईस इंडेक्समध्ये महागाई वाढलेली दिसली तर सरकार जुलैमध्ये डीए वाढवू शकते. जानेवारी, फेब्रुवारीमध्ये यात हलकी वाढ झाली होती. जानेवारीमध्ये डेटा कमी होऊन 125.1 झाला होता, तो फेब्रुवारीमध्ये 125 अंकावर आला होता आता मार्चमध्ये तो वाढून 126 वर पोहचला. जर आगामी महिन्यांमध्ये तो आणखी वाढला तर डीए वाढणे निश्चित आहे. (7th Pay Commission)

डीए वाढीबाबत काय अपेक्षा करावी
सरकार वर्षात दोनवेळा डीए वाढवते. या वर्षाच्या सुरूवातीला सरकारने डीए एकदा वाढवला आहे. आता असे वृत्त आले आहे की, केंद्र पुन्हा एकदा डीएमध्ये 4 टक्के वाढ करू शकते. आता डीए 34 टक्के आहे. जर यामध्ये 4 टक्के आणखी वाढ झाली तर तो 38 टक्के होऊ शकतो. या निर्णयाने 50 लाखापेक्षा जास्त सरकारी कर्मचारी आणि 65 लाख पेन्शनधारकांना फायदा होईल.

 

38 टक्के झाल्यावर किती वाढेल पगार
ज्या कर्मचार्‍यांची बेसिक सॅलरी 56,900 रूपये आहे, त्यांना 38 टक्के महागाई भत्ता झाल्यानंतर 21,622 रूपये डीए मिळेल. आता 34 टक्के डीएच्या हिशेबाने 19,346 रुपये मिळत आहेत. 4 टक्के डीए वाढल्याने सॅलरीत 2276 रुपये वाढतील. म्हणजे, वार्षिक सुमारे 27,312 रूपये वाढतील.

 

Advt.

मागील डीए वाढीवर एक नजर
जुलै 2021 मध्ये केंद्राने महागाई भत्ता आणि महागाई मदत 17 टक्केने वाढून 28 टक्के केला.
केंद्र सरकारने कोरोना व्हायरस महामारीमुळे जवळपास दीड वर्षापासून डीए रोखला होता.
ऑक्टोबर 2021 मध्ये 3 टक्के आणि वाढीसह केंद्र सरकारच्या कर्मचार्‍यांसाठी डीए वाढून 31 टक्के झाला.
आता तो 3 टक्के वाढवून 34 टक्के केला आहे.

 

Web Title :- 7th Pay Commission | 7th pay commission dearness allowance da new da will be 38 percent 27 thousand salary will increase check salary update

 

Join our WhatsApp Group, Telegram, facebook page and Twitter for every update

 

हे देखील वाचा