7th Pay Commission | ‘या’ 2.5 लाख सरकारी नोकरदारांना सुद्धा मिळेल मोठा महागाई भत्ता, मोदी सरकारने दिली भेट

नवी दिल्ली : 7th Pay Commission | मोदी सरकारने (Modi Government) पोस्ट ऑफिसमध्ये (Post Officer) काम करणार्‍या अडीच लाख ग्रामीण डाक सेवकांना (GDS) 31 टक्के महागाई भत्ता देण्याचा निर्णय घेतला आहे. आता त्यांना इतर केंद्रीय कर्मचार्‍यांप्रमाणे दरमहिना सॅलरीमध्ये वाढलेला DA मिळेल. त्यांच्या डीएमध्ये जुलैपासून आतापर्यंत 14 टक्के वाढ झाली आहे. Postal Department ने ही वाढ तात्काळ लागू करण्यास सांगितले आहे. (7th Pay Commission)

डिपार्टमेंट ऑफ पोस्टचे ADG तरुण मित्तल यांच्यानुसार Gramin Dak sewak ला 1 जुलै 2021 पासून डीएमध्ये 14 टक्के वाढीचा फायदा मिळेल. आता त्यांचा डीए 17 टक्केवरून वाढून 31 टक्के झाला आहे. GDS ची सॅलरी 10 हजार रुपयांपासून सुरू होऊन 14500 रुपये महिनापर्यंत असते. ही सॅलरी कामाच्या तासांनुसार ठरते.

Sushmita Sen | ‘शेरनी इज बॅक’ सुष्मीताची नवीन पोस्ट जोरदार व्हायरल, जाणून घ्या पोस्टमध्ये काय?

महागाईची (7th Pay Commission) गणना करणारे एजी ऑफिस ब्रदरहुडचे माजी अध्यक्ष एच.एस. तिवारी यांनी सांगितले की, GDS पोस्टल विभागाचे सर्वात जास्त डिमांड असलेले पद आहे. पोस्ट कार्यालयात यांची नियुक्ती पोस्टमन म्हणून होते. डिपार्टमेंट ऑफ पोस्टमध्ये सध्या 1.71 लाख कर्मचारी आहेत, तर जीडीएसची संख्या अडीच लाखाच्या जवळपास आहे. हा आकडा मार्च 2020 पर्यंचा आहे.

एच.एस. तिवारी (H.S. Tiwari) यांनी सांगितले की, Covid च्या दरम्यान GDS चा सुद्धा महागाई भत्ता वाढला नव्हता. परंतु आता सरकारने सर्व केंद्रीय कर्मचार्‍यांचा महागाई भत्ता वाढवला आहे. पोस्ट कार्यालयातून सुद्धा ही वाढ लागू केली जात आहे. अगोदर त्यांचा DA सुद्धा 17 टक्केवरून वाढून 28 टक्के झाला होता आणि आता 3 टक्के वाढ (7th Pay Commission) आणखी मिळाली आहे.

एच.एस. तिवारी यांनी सांगितले की, GDS ने जर 4 तास काम केले तर त्यास 10 हजार रुपये पगार मिळतो.
जर 5 तास काम केले तर ही रक्कम 12000 रुपये किमान होते. यानंतर सॅलरीत अनुभवासह वाढ सुद्धा होते.

हे देखील वाचा

MNS चित्रपट सेनेच्या वतीने ‘मैत्री बॉक्स क्रिकेट लीग-२०२१’ स्पर्धेचे आयोजन; कलाकारांच्या प्रश्नांसाठी भिडणारे पदाधिकारी आता भिडणार क्रिकेट च्या मैदानात !

Gold Silver Price Today | 5 महिन्यानंतर सोन्याचा भाव 50 हजार पार, चांदीही वधारली; जाणून घ्या

PMRDA Election | PMRDA च्या निवडणुकीत भाजपनं 14 जागांवर बाजी मारली; शिवसेना-राष्ट्रवादीही विजयी तर काँग्रेसला धक्का

ट्विटर ला देखील फॉलो करा

फेसबुक ला लाईक करा

Web Titel : 7th Pay Commission | 7th pay commission dearness allowance hike news for gramin dak sevaks gds effective 01 july 2021 onwards modi government

Join our WhatsApp GroupTelegramfacebook page and Twitter for every update