7th Pay Commission | सरकारी कर्मचारी करताहेत DA वाढण्याची प्रतीक्षा, परंतु यांना मिळाले 19200 रुपयांचे Diwali Gift

नवी दिल्ली : वृत्तसंस्था 7th Pay Commission | केंद्रीय कर्मचारी महागाई भत्त्यात (Dearness Allowance, DA) वाढीची अजूनही प्रतीक्षा करत आहे. तिकडे, मध्य प्रदेशमध्ये याबाबत घोषणासुद्धा झाली. राज्य सरकारने सर्व शासकीय कर्मचार्‍यांच्या डीएमध्ये 8 टक्के वाढीची घोषणा केली आहे. विशेष म्हणजे सरकारने यास Diwali gift म्हटले आहे. असेही म्हटले आहे की नोव्हेंबरच्या पगारात हा भत्ता मिळेल. म्हणजे सरकारी कर्मचार्‍यांच्या वेतनात चांगली वाढ (7th Pay Commission) होईल.

 

DA चे कॅलक्युलेशन करणारे आणि एजी ऑफिस ब्रदरहुड, प्रयागराजचे माजी अध्यक्ष हरिशंकर तिवारी यांच्यानुसार एमपीमध्ये 8 टक्के डीए वाढण्याचा अर्थ आहे की, 20 हजार बेसिक सॅलरी घेणार्‍यांना 19200 रुपयांचा वार्षिक फायदा  होईल.
एमपी सरकारच्या प्रवक्त्यानुसार शिवराज सरकारने सरकारी कर्मचार्‍यांना दिवाळी भेट दिली आहे.
त्यांच्या महागाई भत्त्यात 8 टक्के वाढ केली आहे. यामुळे आता तो 12 वरून वाढून एकुण 20 टक्के झाला आहे.
त्यांची जुलै 2020 आणि जानेवारी 2021 ची पगारवाढ सुद्धा रोखली होती.

 

 

पगारात सुद्धा वाढ

 

 

आणखी एक चांगली बातमी आहे की, शासकीय कर्मचार्‍यांची सॅलरी सुद्धा वाढणार आहे. याची 50 टक्के रक्कम नोव्हेंबर 2021 मध्ये मिळेल.
तर उर्वरित मार्च 2022 मध्ये मिळेल. अशाप्रकारे कर्मचार्‍यांना दुहेरी फायदा झाला  आहे.

 

 

वाढेल महागाई भत्ता

 

 

मीडिया रिपोर्टमध्ये म्हटले जात आहे की, मोदी सरकार केंद्रीय कर्मचारी आणि पेन्शनर्सच्या महागाई भत्त्यात 3 टक्के वाढीची घोषणा करू शकते.
ही घोषणा दिवाळी भेट म्हणून केली जाईल. उत्तर प्रदेशातील विधानसभा निवडणुका पहाता सरकारच्या या निर्णयाला गेम चेंजर म्हटले जाऊ शकते.

 

Web Title : 7th Pay Commission | 7th pay commission dearness allowance increased in madhya pradesh will effect employees salary dearness allowance house rent allowance and transport allowance

Join our WhatsApp GroupTelegramfacebook page and Twitter for every update

Coronavirus in Maharashtra | दिलासादायक ! राज्यात गेल्या 24 तासात 2,968 रुग्ण ‘कोरोना’मुक्त, जाणून घ्या इतर आकडेवारी

State Bank of India | खुशखबर ! ‘या’ बँक ग्राहकांना घरबसल्या मिळणार 20 हजार रूपयांपर्यंत कॅश, जाणून घ्या काय आहे ही सर्व्हिस

7th Pay Commission | खुशखबर ! मोदी सरकारकडून सरकारी कर्मचार्‍यांना दिवाळीनिमित्त मोठं गिफ्ट; DA 3% नी वाढवला