7th Pay Commission | दिवाळीपूर्वी ‘या’ कर्मचार्‍यांना भेट, सरकारने वाढवला महागाई भत्ता

नवी दिल्ली : वृत्तसंस्था –  7th Pay Commission | पंजाबमध्ये मुख्यमंत्री चरणजीत सिंह चन्नी यांच्या नेतृत्वाखालील काँग्रेस सरकारने सोमवारी (1 नोव्हेंबर 2021) आपल्या कर्मचार्‍यांचा महागाई भत्ता सध्याच्या 17 टक्केवरून वाढवून मूळ वेतनाच्या 28 टक्के केला. धनत्रयोदशी आणि दिवाळीपूर्वी राज्य सरकारच्या या पावलाने राज्य सरकारी कर्मचार्‍यांना मोठी भेट मिळाली आहे. मात्र यामुळे राज्य सरकारच्या तिजोरीवर दरमहिना 440 कोटी रुपयांचा अतिरिक्त भार (7th Pay Commission) येणार आहे.

 

सीएम चन्नी यांच्या अध्यक्षतेखाली मंत्रिमंडळाने हा निर्णय घेतला. मुख्यमंत्र्यांनी चंदीगढमध्ये पत्रकारांना सांगितले की,
महागाई भत्ता (डीए) 17 वरून वाढवून 28 टक्के केल्याने तिजोरीवर दरमहिना 440 कोटी रुपयांचा अतिरिक्त भार पडणार आहे. त्यांनी म्हटले की, डीए जुलैपासून वाढवण्यात आला आहे.
कर्मचारी राज्य प्रशासनाचा कणा आहेत आणि त्यांच्या कल्याणाला सर्वोच्च प्राधान्य देण्यासाठी सरकार प्रतिबद्ध आहे.

 

सीएमने ही सुद्धा घोषणा केले की, 1 जानेवारी 2016 नंतर भरती करण्यात आलेल्या कर्मचार्‍यांना सुद्धा इतर कर्मचार्‍यांइतकाच सुधारित वेतनात किमान 15 टक्के वाढीचा लाभ दिला जाईल.
मात्र, कोणत्याही कनिष्ठ कर्मचार्‍याचे वेतन त्याच्या वरिष्ठाच्या वेतनापेक्षा जास्त ठरवले जाणार नाही.

 

चन्नी म्हणाले, विविध कर्मचारी संघाच्या प्रतिनिधींनी त्यांना आश्वासन दिले आहे की, ते आंदोलनाच्या मार्गावर चालणार नाहीत.
उलट, आपसात चर्चेच्या माध्यमातून मुद्द्यावर मार्ग काढण्यास मदत करतील.

 

Web Title : 7th Pay Commission | 7th pay commission dearness allowance of punjab government employees hiked to 28 percent

Join our WhatsApp GroupTelegramfacebook page and Twitter for every update

Winter Health Care | हिवाळ्यात आजारी पडायचं नसेल तर आवश्य फॉलो करा ‘या’ 5 टिप्स; जाणून घ्या

Ashish Shelar | ‘परमबीर सिंग गायब होण्यामागे ठाकरे सरकार, ते सापडले तर सरकारचं पितळ उघडं पडेल’; आशिष शेलार यांचा आरोप

Aryan Khan Drug Case | आर्यन खान प्रकरण ! सॅम डिसोझाने केला धक्कादायक खुलासा; सुनील पाटीलने पार्टीची घेतली होती माहिती