7th Pay Commission | अर्थ मंत्रालयाने सरकारी कर्मचार्‍यांसाठी 31 टक्के महागाई भत्ता 1 जुलै 2021 पासून केला लागू

नवी दिल्ली : वृत्तसंस्था –  7th Pay Commission | मोदी सरकार (Modi Government) ने केंद्रीय कर्मचार्‍यांना दिवाळीची (Diwali 2021) भेट दिली आहे. अर्थ मंत्रालयाने (Ministry of Finance) म्हटले की, केंद्रीय कर्मचार्‍यांसाठी महागाई भत्ता (Dearness Allowance) मूळ वेतनाच्या 28 टक्केवरून वाढवून 31 टक्के करण्यात आला आहे आणि तो 1 जुलै 2021 पासून प्रभावी (DA Implemented) झाला आहे. (7th Pay Commission)

 

अर्थ मंत्रालयांतर्गत येणार्‍या खर्च विभागाने (Department of Expenditure) म्हटले की, मूळ वेतनाचा अर्थ 7व्या वेतन आयोगानुसार मिळणारे वेतन आहे.
यामध्ये इतर कोणत्याही विशेष वेतन किंवा भत्त्यांचा समावेश नाही. खर्च विभागाने 25 ऑक्टोबर 2021 रोजी जारी कार्यालय निवेदनात म्हटले आहे की,
केंद्र सरकारच्या कर्मचार्‍यांना देय महागाई भत्ता 1 जुलै 2021 पासून मूळ वेतनाच्या (Basic Salary) सध्याच्या 28 टक्केवरून वाढवून 31 टक्के केला जाईल. (7th Pay Commission)

 

सशस्त्र दले-रेल्वे कर्मचार्‍यांसाठी वेगळ आदेश

 

डीएमधील ही वाढ संरक्षण सेवेतून (Defence Services) वेतन घेणार्‍या असैन्य कर्मचार्‍यांवर सुद्धा लागू होईल.
तर, सशस्त्र दलाचे कर्मचारी (Armed Forces) आणि रेल्वे कर्मचार्‍यांच्या (Railway Employees) संबंधी संरक्षण आणि रेल्वे मंत्रालय वेगळा आदेश जारी करतील.

 

केंद्रीय मंत्रिमंडळाने मागील आठवड्यात सरकारी कर्मचार्‍यांसाठी महागाई भत्ता आणि पेन्शन धारकांसाठी महागाई मदत (DR) 3 टक्के वाढवण्यास मंजूरी दिली होती.

 

डीए वाढीने तिजोरीवर पडणार 9,488 कोटीचा भार

 

केंद्र सरकारच्या या निर्णयाने सुमारे 47.14 लाख केंद्रीय कर्मचारी आणि 68.62 लाख पेन्शनधारकांना (Pensioners) थेट फायदा होईल.
मोदी सरकारने यावर्षी जुलैमध्ये महागाई भत्त्याचा दर 17 टक्केने वाढवून 28 टक्के केला होता. आता यामध्ये पुन्हा एकदा तीन टक्के वाढ केली आहे.

 

Web Title : 7th Pay Commission | 7th pay commission dearness allownace hike to 31 percent effective from 1 july 2021 salary hike finance ministry

Join our WhatsApp GroupTelegramfacebook page and Twitter for every update

Fake Tea Leaf Detection | तुम्ही बनावट चहापत्तीचे सेवन करत आहात का?, ‘या’ अतिशय सोप्या ‘ट्रिक’ने घरबसल्या जाणून घ्या

PMPML | ‘पीएमपीएमएल’च्या 10 हजार कर्मचाऱ्यांची दिवाळी होणार ‘गोड’, ‘स्थायी’ची ‘बोनस’ प्रस्तावला मंजुरी; जाणून घ्या 

Mumbai Drug Case | समीर वानखेडेंच्या वडिलांसंदर्भात नवाब मलिकांकडून आणखी एक पुरावा