7th Pay Commission | सरकारने DA कॅलक्युलेशनमध्ये केला बदल, जाणून घ्या कसं करावं नवीन पगाराचा ‘हिशोब’

नवी दिल्ली : वृत्तसंस्था –  7th Pay Commission | केंद्रीय कर्मचार्‍यांना महागाई भत्ता (Dearness Allowance), एचआरए (HRA) आणि टीए (TA) मध्ये वाढीसह दिवाळीची भेट दिल्यानंतर केंद्र सरकारने केंद्रीय कर्मचार्‍यांसाठी महागाई भत्त्याच्या (DA) गणनेत (DA Calculation) काही बदल केले आहेत. (7th Pay Commission)

 

केंद्र सरकारच्या कामगार आणि रोजगार मंत्रालयाकडून अलिकडेच या फॉर्म्युलामध्ये बदल करण्यात आला होता.
बेस ईयर 2016=100 ही वेज रेट इंडेक्स (WRI) ची नवीन सीरीज, 1963 65=100 या जुन्या सीरीजची जागा घेईल.

 

केंद्र सरकारने बदलले बेस ईयर

 

आधार वर्ष 2016=100 ही WRI ची नवीन सीरीज, 1963-65 आधार वर्षाच्या जुन्या सीरीजचे स्थान घेईल.
म्हणजे आता महागाई भत्त्याच्या कॅलक्युलेशनची पद्धत बदलेल. महागाईच्या आकड्यांच्या आधारावर सरकार वेळोवेळी प्रमुख आर्थिक संकेतांसाठी आधार वर्ष (Inflation Base Year) मध्ये बदल करते.

 

कसे होते DA कॅलक्युलेशन?

 

महागाई भत्त्याचा सध्याचा दर गुणीले तुमचे मूळ वेतन (Basic Pay) म्हणजे महगाई भत्त्याची रक्कम होय.
उदाहाणार्थ, टक्केच्या सध्याच्या दर 12% आहे, जर तुमचे मूळ वेतन 49000 रुपये तर डीए (49000 x12)/100 आहे.

 

 (DA) म्हणजे काय?

 

महागाई भत्ता हा कर्मचार्‍याच्या मूळ पगाराचा एक निश्चित भाग असतो. महागाईचा प्रभाव कमी करण्यासाठी सरकार कर्मचार्‍यांना महागाई भत्ता देते.
याच्यात वेळोवेळी वाढ केली जाते. पेन्शनधारकांना हा लाभ महागाई सवलत (DR) म्हणून दिला जातो.

 

Web Title : 7th Pay Commission | 7th pay commission government change in da calculation check new salary calculation

Join our WhatsApp GroupTelegramfacebook page and Twitter for every update

Bigg Boss 15 | ‘लग्न करुन पळून गेला’, पतिवर आरोप होताच राखीने करण कुंद्राला दिलं कडाडून उत्तर, म्हणाली…

Gold Price Today | सोने आज 242 रुपयांनी महागले, चांदीच्या दरात 543 रुपयांची उसळी; जाणून घ्या नवीन दर

Devendra Fadnavis | अमृता फडणवीस राजकारणात येणार का? देवेंद्र फडणवीसांनी स्पष्टच सांगितलं