7th Pay Commission | मोठी बातमी ! महागाई भत्त्याच्या कॅलक्युलेशनचा बदलला फार्म्युला! जाणून घ्या आता किती मिळेल सॅलरी

नवी दिल्ली : वृत्तसंस्था – 7th Pay Commission | केंद्रीय कर्मचार्‍यांसाठी मोठी बातमी आहे. महागाई भत्त्याच्या कॅलक्युलेशनबाबत बदल करण्यात आला आहे. केंद्र सरकारच्या कामगार मंत्रालयाने (Ministry of Labour and Employment) महागाई भत्त्याच्या कॅलक्युलेशनचा फार्म्युला बदलला आहे. (7th Pay Commission)

 

महागाई भत्त्याचे आधार वर्ष (Base Year) 2016 करण्यात आले आहे. मंत्रालयाने मजूरी दर निर्देशांकाची (WRI-Wage Rate Index) ही नवीन सीरीज जारी केली आहे. कामगार मंत्रालयाने म्हटले की, आधार वर्ष 2016=100 ही WRI ची नवीन सीरीज, 1963-65 आधार वर्षाच्या जुन्या सीरीजचे स्थान घेईल. म्हणजे आता महागाई भत्त्याच्या कॅलक्युलेशनची पद्धत बदलेल.

 

आधार वर्ष बदलते सरकार
महागाईच्या आकड्यांच्या आधारावर सरकार वेळोवेळी प्रमुख आर्थिक संकेतांसाठी आधार वर्ष (Inflation Base Year) मध्ये संशोधन करते. यात अर्थव्यवस्थेत येणार्‍या बदलांच्या आधारावर बदल केला जातो आणि मजूरांच्या वेज पॅटर्नचा समावेश केला जातो. (7th Pay Commission)

 

आंतरराष्ट्रीय कामगार संघटना (ILO), राष्ट्रीय सांख्यिकी आयोगाच्या (National Statistical Commission) शिफारसींनुसार, कक्षा वाढवणे आणि निर्देशांक चांगला बनवण्यासाठी मजूरी दर निर्देशांकाचे आधार वर्ष 1963-65 वरून बदलून 2016 केले आहे.

कसे होते महागाई भत्त्याचे कॅलक्युलेशन (DA Calculation Formula)
महागाई भत्त्याचा सध्याचा दर गुणीले तुमचे मूळ वेतन (Basic Pay) म्हणजे महगाई भत्त्याची रक्कम होय.
उदाहाणार्थ, टक्केच्या सध्याच्या दर 12% आहे, जर तुमचे मूळ वेतन 49000 रुपये तर डीए (49000 x12)/100 आहे.

 

महागाई भत्ता म्हणजे काय?
DA हा कर्मचार्‍याच्या मूळ पगाराचा एक निश्चित भाग असतो.
महागाईचा प्रभाव कमी करण्यासाठी सरकार कर्मचार्‍यांना महागाई भत्ता देते.
याच्यात वेळोवेळी वाढ केली जाते. पेन्शनधारकांना हा लाभ महागाई सवलत (DR) म्हणून दिला जातो.

 

Web Title :- 7th Pay Commission | 7th pay commission government changed dearness allowance base year to 2016 da updates cpc latest news

 

Join our WhatsApp GroupTelegramfacebook page and Twitter for every update

 

हे देखील वाचा

Nawab Malik | ‘अनिल देशमुखांप्रमाणे मलाही अडकवण्याचे कटकारस्थान सुरू, केंद्रीय गृहमंत्री अमित शहांकडे तक्रार करणार’ – नवाब मलिक

Katrina Kaif | ‘या’ अभिनेत्याचा वाईट वागणुकीमुळं सलमान खान समोर रडली कतरिना, जाणून घ्या कोण होता तो अभिनेता?

Rakesh Jhunjhunwala | राकेश झुनझुनवाला यांनी ‘या’ स्टॉकमधून 1 आठवड्यात गमावले 753 कोटी रुपये; तुम्ही तर घेतला नाही ना?

Pune News | वारकर्‍यांच्या दिंडीला झालेल्या भीषण अपघातात दोघांचा मृत्यू; 20 जखमी, मावळ तालुक्यातील साते फाट्यावरील घटना