7th Pay Commission | सरकारी कर्मचाऱ्यांना दिवाळीची खास भेट ! ऑक्टोबरच्या पगारात मिळणार ‘हे’ 3 भत्ते, जाणून घ्या किती मिळेल पगार

नवी दिल्ली : वृत्तसंस्था – 7th Pay Commission | केंद्र सरकारच्या कर्मचाऱ्यांसाठी (Central Government Employee) दिवाळीपूर्वीच मोठं गिफ्ट देण्याच्या तयारीत आहे. मोदी सरकारने (Modi government) मागील आठवड्यात झालेल्या मंत्रिमंडळाच्या बैठकीत महागाई भत्ता (Dearness Allowance Hike) तीन टक्के वाढवण्याचा निर्णय घेतला आहे. केंद्रीय कर्मचाऱ्यांना (7th Pay Commission) ऑक्टोबर 2021 च्या पगारात अतिरिक्त तीन टक्के महागाई भत्त्याच्या लाभासह हाऊस रेंट अलाऊन्स (HRA) आणि एज्युकेशन अलाऊन्स (Education Allowance) मिळणार आहे. एकदंरीतच सरकारी कर्मचाऱ्यांचा ऑक्टोबर महिन्याचा पगार वाढलेला असेल.

 

3 टक्के महागाई भत्ता
केंद्रीय मंत्रिमंडळाच्या बैठकीत केंद्रीय सरकारी कर्मचारी (Central Government Employee) आणि निवृत्ती वेतनधारकांसाठी तीन टक्के महागाई भत्ता आणि महागाई सवलत वाढ मंजूर केली. खर्च विभागाच्या एका वरिष्ठ अधिकाऱ्याने सांगितले की, महागाई वाढल्यामुळे केंद्र सरकारने (Central Government) डीए वाढवण्याचा निर्णय घेतला आहे. यामुळे आता डीए 28 टक्क्यांवरुन 31 टक्के झाला आहे. केंद्रीय मंत्रिमंडळाच्या बैठकीत (Union Cabinet meeting) हा निर्णय घेण्यात आला. केंद्रातील 47.14 लाख कर्मचारी आणि 68.62 लाख पेन्शनधारकांना याचा फायदा होणार आहे. महागाई भत्त्याचा (7th Pay Commission) नवीन दर जुलै 2021 पासून लागू होणार आहे.

 

DA चं कॅलक्यूलेशन ?
जर कर्मचाऱ्याचे मूळ वेतन 56900 रुपये असेल, तर नवीन महागाई भत्त्यानुसार म्हणजे 31 टक्क्यानुसार भत्ता 17639 रुपये प्रति महिना असेल. तर आधीच्या 28 टक्के महागाई भत्त्याच्या हिशोबाने 15932 रुपये/ महिना DA मिळाला असता. म्हणजे एकूण महागाई भत्त्यात वाढ 1707 रुपये होईल. ही वाढ वार्षिक (7th Pay Commission) मोजली असता 20484 रुपये असेल.

एज्युकेशन अलाउन्स मिळणार
सातव्या वेतन आयोगानुसार (7th Pay Commission) केंद्रीय कर्मचाऱ्यांना मुलांच्या शिक्षणावर 2250 रुपये शैक्षणिक भत्ता मिळतो. मगाली वर्षी कोरोनामुळे करण्यात आलेल्या लॉकडाऊनमुळे कर्मचाीर त्यासाठी दावा करु शकले नाहीत. केंद्र सरकारने बालशिक्षण भत्ता (CEA Children Education Allowance) दावा सेल्फ सर्टिफाइड केला आहे. केंद्रीय कर्मचाऱ्यांना 2 मुलांच्या शिक्षणासाठी 2250 रुपये प्रति बालक भत्ता मिळतो. आता कर्मचारी क्लेम करु शकतात. त्यामुळे दोन अपत्या असणाऱ्या कर्मचाऱ्यांना दरमहा 4500 रुपये अधिक पगार मिळणार आहे.

 

HRA मध्ये वाढ
नियमानुसार डीए 25 टक्क्यांपेक्षा जास्त असल्यास एचआरए वाढवावा लागेल.
त्यामुळे केंद्र सरकारने एचआरए वाढवून 27 टक्के करण्याचा निर्णय घेतला आहे.
7 जुलै 2017 रोजी खर्च विभागाने जारी केलेल्या आदेशात असे म्हटले होते की,
जेव्हा DA 25 टक्क्यांपेक्षा जास्त असेल, तेव्हा HRA मध्येही सुधारणा केली जाईल.

 

Web Title :- 7th Pay Commission | 7th pay commission government employees will get 3 allowances in october salary hike da hra education allowance check here

 

Join our WhatsApp GroupTelegramfacebook page and Twitter for every update

हे देखील वाचा

Pune NCP | चंद्रकांत पाटील यांचे ‘ते’ विधान म्हणजे उच्च दर्जाची मनोरंजन सेवा; राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रवक्ते प्रदिप देशमुख यांचा ‘घणाघात’ (व्हिडीओ)

Chitra Wagh | ‘जनाब संजय राऊत तुम्हाला नबाव मलिकांच्या नजरेतूनच हिंदुस्थान पाहायचाय’ (व्हिडीओ)

Devendra Fadnavis | ड्रग्ज प्रकरणावरून देवेंद्र फडणवीसांचा इशारा; म्हणाले – ‘…तर साक्षीदारांची विश्वासहार्यता संपुष्टात येईल’