7th Pay Commission | केंद्रीय कर्मचार्‍यांना होणार फायदा, सरकारने घर खरेदी करण्यासाठी दिला मोठा दिलासा

नवी दिल्ली : वृत्तसंस्था – 7th Pay Commission | मोदी सरकारने (Modi Government) केंद्रीय कर्मचार्‍यांना (Central Staff) मोठा दिलासा दिला आहे. सरकारी कर्मचार्‍यांना घर बांधण्यासाठी बिल्डिंग अ‍ॅडव्हान्स (Advance) म्हणजे होम लोन अ‍ॅडव्हान्ससाठी (Home Loan Advance) व्याजदर 7.9 टक्केवरून कमी करून 7.1 टक्के केला आहे. मीडिया रिपोर्टनुसार, सरकारने यासाठी ऑफिस मेमोरेंडम सुद्धा जारी केला आहे. (7th Pay Commission)

 

केंद्र सरकारने (Central Government) 1 एप्रिल 2022 पासून 31 मार्च 2023 पर्यंतसाठी कर्मचार्‍यांना घर बांधण्यासाठी, घर किंवा फ्लॅट खरेदीसाठी घेतलेल्या अ‍ॅडव्हान्सच्या व्याजात कपात केली आहे. आता त्यांना 0.8 टक्के कमी व्याज द्यावे लागेल. सरकारने 80 बेसिस पॉईंटची कपात केली आहे.

 

आता या दराने मिळेल अ‍ॅडव्हान्स

घर आणि शहरी प्रकरणांत मंत्रालयाने ऑफिस मेमोरेंडम जारी करून होम लोन अ‍ॅडव्हान्सच्या व्याजदरात कपातीची माहिती दिली आहे. कर्मचार्‍यांना आता 31 मार्च 2023 पर्यंत 7.1 टक्के वार्षिक व्याजदराने अ‍ॅडव्हान्स मिळू शकतो. अगोदर हा दर 7.9 टक्के वार्षिक होता.

 

घर बांधण्यासाठी इतका घेऊ शकतात अ‍ॅडव्हान्स

कर्मचारी घर बांधण्यासाठी सरकारकडून होम लोन अ‍ॅडव्हान्स घेऊ शकतात.
हे लोन दोन पद्धतीने मिळू शकते. 24 महिन्यांचे बेसिक वेतन किंवा 25 लाख रूपये अ‍ॅडव्हान्स घेऊ शकतात.
याशिवाय घराची किंमत किंवा कर्ज परतफेडीच्या क्षमतेच्या आधारावर सुद्धा अ‍ॅडव्हान्स घेऊ शकतात.

 

Web Title :- 7th Pay Commission | 7th pay commission government house building advance interest rate decrease relief central employees home loan advance

 

Join our WhatsApp GroupTelegramfacebook page and Twitter for every update

 

हे देखील वाचा