7th Pay Commission | नवरात्रीत होऊ शकते DA वाढवण्याची घोषणा! मग किती वाढणार पगार? जाणून घ्या

नवी दिल्ली : 7th Pay Commission | महागाई भत्ता (Dearness Allowance-DA) वाढवण्याच्या प्रतीक्षेत असलेले लाखो केंद्र सरकारी कर्मचारी आणि पेन्शनधारकांना लवकरच चांगली बातमी मिळणार आहे. डीए वाढवण्याबाबत अद्याप कोणतेही अधिकृत विधान न केलेले केंद्र सरकार दसर्‍यापूर्वी घोषणा करू शकते. (7th Pay Commission)

मनीकंट्रोलनुसार, मोदी सरकार नवरात्रीच्या शुभ मुहूर्तावर कर्मचारी आणि पेन्शनधारकांना मोठी भेट देऊ शकते. केंद्र सरकार दर 6 महिन्यांनी डीए वाढवण्याची घोषणा करते, जो महागाईच्या तुलनेत कर्मचार्‍यांना आणि पेन्शनधारकांना दिलासा देण्यासाठी वाढवला जातो. 28 सप्टेंबर रोजी पंतप्रधान नरेंद्र मोदी (PM Narendra Modi) यांच्या नेतृत्वाखाली होणार्‍या मंत्रिमंडळाच्या बैठकीत यासाठी मंजुरी मिळू शकते, असे मानले जात आहे. (7th Pay Commission)

38% पर्यंत पोहोचू शकतो महागाई भत्ता

सूत्रांचे म्हणणे आहे की किरकोळ महागाईचा उच्च दर पाहता सरकार यावेळी महागाई भत्त्यात 4 टक्क्यांनी वाढ करू शकते. यानंतर, डीए वाढून 38 टक्के होईल. यापूर्वी मार्च 2022 मध्ये सरकारने डीए वाढवण्याची घोषणा केली होती, त्यानंतर त्यात 3 टक्के वाढ करण्यात आली होती. यानंतर डीए 31 टक्क्यांवरून 34 टक्के करण्यात आला. यावेळी महागाईचा दर जास्त असल्याने डीएमध्ये आणखी वाढ होऊ शकते.

कधीपासून मिळणार लाभ

सरकारने सप्टेंबरमध्ये डीए वाढवण्याची घोषणा केली, तर ऑक्टोबरमध्ये येणार्‍या पगारात ही रक्कम वाढण्याची शक्यता आहे, तर उर्वरित महिन्यांचा एरियर भरला जाण्याची शक्यता आहे.
47 लाख केंद्रीय कर्मचारी आणि 68 लाख पेन्शनधारकांना याचा लाभ मिळणार आहे.
कर्मचार्‍यांच्या वेतनश्रेणीनुसार डीएमध्ये वाढ केली जाते. मूळ पगार जितका जास्त तितका महागाई भत्ता वाढतो.

किती वाढेल पगार

समजा एखाद्या कर्मचार्‍याचे मूळ वेतन 40 हजार रुपये असेल तर त्याला 34% म्हणजेच 13,600 रुपये महागाई भत्ता मिळेल.
जर महागाई भत्ता 38 टक्के वाढला तर त्याची एकूण रक्कम 15,200 रुपये होईल.
अशा प्रकारे, दरमहा पगारात 1,600 रुपयांची वाढ होईल आणि एका वर्षात 19,200 रुपये जास्त मिळतील.

Web Title :- 7th Pay Commission | 7th pay commission government will hike da before dussehra see detail here

 

Join our WhatsApp GroupTelegramfacebook page and Twitter for every update

 

हे देखील वाचा

Pune Crime | अश्लील व्हिडिओ दाखवून बागेत खेळणाऱ्या शाळकरी मुलीचा विनयभंग; खडकी परिसरातील घटना

Ajit Pawar | अजित पवार पुन्हा पक्षावर नाराज आहेत का? पत्रकार परिषद घेऊन दिले स्पष्टीकरण

Union Minister Nitin Gadkari | “मी आयुष्यभर माझ्या विचाराप्रमाणेच काम करेन”, नितीन गडकरींनी केले स्पष्ट