7th Pay Commission | रिव्हाईज्ड HRA चा सॅलरीत समावेश झाल्याने कर्मचार्‍यांना वार्षिक किती होईल फायदा, जाणून घ्या

नवी दिल्ली : 7th Pay Commission | केंद्र सरकारी कर्मचार्‍यांना (central government employees) या दिवाळीत (diwali) मोठा लाभ होणार आहे. महागाई भत्त्याचा दुसरा हप्ता येईल, सोबतच रिव्हाईज्ड एचआरएचा सुद्धा सॅलरीत समावेश होऊन येण्याची शक्यता आहे. यासाठी आज डीएसह (DA) एचआरएवर (HRA) सुद्धा चर्चा केली (7th Pay Commission) जाईल.

प्रत्यक्षात केंद्र सरकारकडून स्पष्ट करण्यात आले होते की, जेव्हा डीए 25 टक्केपेक्षा जास्त होईल तेव्हा एचआरए ऑटो चेंज होईल. जुलैमध्ये 28 टक्के झाला, ज्यामुळे एचआरए वाढून 27 टक्के झाला आहे. विशेष म्हणजे जास्त बेसिक पगार असलेल्यांना वार्षिक अधारावर 20 हजार रुपयांपेक्षा जास्त फायदा (7th Pay Commission) होईल.

केंद्र सरकारने आदेश जारी करत म्हटले की, सरकारी कर्मचार्‍यांच्या मुळ वेतनाच्या आधारावर हाऊस रेंट अलाऊन्स आणि डीएमध्ये वाढ करण्यात यावी.
नियमानुसार, डीए 25 टक्केपेक्षा जास्त झाल्यास एचआरएमध्ये वाढ करावी लागते.
यासाठी केंद्र सरकारने एचआरए वाढवून 27 टक्के करण्याचा निर्णय घेतला आहे.

अशाप्रकारचे आहे कॅलक्युलेशन

सोप्या शब्दात सांगायचे तर एक्स कॅटेगरीच्या केंद्रीय कर्मचार्‍यांना आता 5400 रुपये महिन्यापेक्षा जास्त एचआरए मिळेल.
यानंतर वाय क्लास शहरातील कर्मचार्‍यांना 3600 रुपये महिना आणि झेड क्लास शहरातील कर्मचार्‍यांना 1800 रुपये महिना जास्त हाऊस रेंट अलाऊन्स मिळेल.

3 टक्के आणखी वाढू शकतो डीए

AICPI चा जून 2021 मध्ये आकड़ा 121.7 वर पोहचला आहे. यामध्ये 1.1 अंकाची वाढ झाली आहे.
अशाप्रकारे एकुण डीए 31.18 टक्के होतो. परंतु, डीएचे पेमेंट राऊंड फिगरमध्ये होते.
यामुळे डिए 31 टक्के मिळेल. आता पुन्हा 3 टक्के वाढीनंतर महागाई भत्ता 31 टक्केच्या स्तरावर पोहचेल.
म्हणजे केंद्रीय कर्मचार्‍यांच्या पगारात पुन्हा एकदा मोठी वाढ होईल.

हे देखील वाचा

Anti Corruption Bureau Pune | पुण्यातील लाचखोर उपायुक्त नितीन ढगेच्या घरात सापडले 2.81 कोटींचं ‘घबाड’; ‘बेनामी’चा होणार पर्दाफाश

Mohan Bhagwat | ‘370 कलम रद्द केल्यानंतरही जम्मू काश्मीरमधील समस्येचं पूर्णपणे निराकरण नाही’

ट्विटर ला देखील फॉलो करा

फेसबुक ला लाईक करा

Web Titel :  7th Pay Commission | 7th pay commission how much will employees get annually revised hra in salary know here in marathi

Join our WhatsApp GroupTelegramfacebook page and Twitter for every update