7th Pay Commission | सरकारी कर्मचार्‍यांच्या बेसिक सॅलरीत होईल मोठी वाढ, फिटमेंट फॅक्टरमुळे वाढेल पगार

नवी दिल्ली : वृत्तसंस्था – 7th Pay Commission | सरकारी कर्मचार्‍यांना (Central Government Employees) लवकरच पगारवाढीची भेट मिळू शकते (Salary Hike). पगारातील ही मोठी वाढ महागाई भत्त्याच्या (DA Hike) वेगळी असेल. यावेळी पगारवाढीचे कारण फिटमेंट फॅक्टर (Fitment Factor) असेल. सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, फिटमेंट फॅक्टर वाढवण्यासाठी सरकार लवकरच मंजुरी देऊ शकते. (7th Pay Commission)

 

गेल्या दोन वर्षांपासून बंद असलेला महागाई भत्ता लवकरच वाढणार आहे. या वाढीनंतर डीए 34 टक्क्यांहून जास्त होईल.

 

यावेळी महागाई भत्त्यात वाढ केल्यानंतर किमान वेतनातही वाढ होण्याची शक्यता बळावली आहे. कर्मचारी संघटनाही याबाबत सातत्याने मागणी करत आहेत. युनियनने फिटमेंट फॅक्टर 2.57 पटवरून 3.68 पट वाढवण्याची मागणी केली आहे.

असे झाल्यास किमान वेतन 18,000 रुपयांवरून 26,000 रुपये होईल. या अगोदर सरकारने 2017 मध्ये एंट्री लेव्हलवर पगार वाढवला होता. त्यानंतर सरकारने मूळ वेतन 7000 रुपयांवरून 18,000 रुपये केले. (7th Pay Commission)

 

फिटमेंट फॅक्टरसह पगार किती वाढेल ?

फिटमेंट फॅक्टर वाढवल्यास कर्मचार्‍यांच्या पगारात लक्षणीय वाढ होऊ शकते.
समजा सरकारने मागणीनुसार फिटमेंट फॅक्टर 3.68 पट वाढवला. तर त्यानुसार कर्मचार्‍यांचे किमान वेतन 26 हजार रुपये होणार आहे.

18,000 च्या मूळ वेतनावरील सर्व भत्ते जोडून 2.57 फिटमेंट फॅक्टर (18,000 X 2.57 = 46260 रुपये) नुसार पगार 46260 रुपये होईल.
जर फिटमेंट फॅक्टर 3.68 असेल तर तुमचा पगार वाढून रु. 95680 (26,000 X 3.68 = 95680) होईल.

 

एकरकमी महागाई भत्ता देण्याची चर्चा

कोरोनामुळे जवळपास 2 वर्षांपासून बंद असलेला महागाई भत्ता मिळण्याचीही चर्चा आहे.
सरकार 2 लाख रुपयांपर्यंतचा डीए एकत्रितपणे देण्याचा विचार करत आहे.

कोविड-19 महामारीमुळे अर्थ मंत्रालयाने मे 2020 ते 30 जून 2021 पर्यंत डीए वाढ थांबवली होती.
जानेवारी 2020 ते जून 2021 पर्यंतचा थकित डीए देण्याची कर्मचार्‍यांची अनेक वर्षांपासूनची मागणी आहे.

मार्च 2022 मध्ये AICPI निर्देशांकात वाढ झाली होती, त्यानंतर हे निश्चित आहे की सरकार महागाई भत्ता (DA) 3 नव्हे तर 5 टक्के वाढवू शकते.
याला मंजुरी मिळाल्यास कर्मचार्‍यांचा डीए 34 टक्क्यांवरून 39 टक्के होईल.

 

Web Title :- 7th Pay Commission | 7th pay commission huge increase in the basic salary of government employees due to the fitment factor

 

Join our WhatsApp Group, Telegram, facebook page and Twitter for every update

 

हे देखील वाचा