Homeताज्या बातम्या7th Pay Commission | सरकारी कर्मचार्‍यांच्या सॅलरीत होईल मोठी वाढ? हाऊस रेंट...

7th Pay Commission | सरकारी कर्मचार्‍यांच्या सॅलरीत होईल मोठी वाढ? हाऊस रेंट अलाऊन्सबाबत (HRA) झाला ‘हा’ खुलासा

नवी दिल्ली : वृत्तसंस्था – 7th Pay Commission | 1 जुलैपासून केंद्रीय कर्मचार्‍यांच्या (central government employees) महागाई भत्त्यात वाढ करण्याच्या आदेशानंतर कर्मचार्‍यांना केंद्र सरकार आणखी एक खुशखबर देणार आहे. 2022 च्या सुरूवातीला लाखो कर्मचार्‍यांचा हाऊस रेंट अलाऊन्स (HRA) वाढवण्यावर सरकार विचार करत आहे. जर सरकारने केंद्रीय कर्मचार्‍यांच्या HRD मध्ये वाढ केली तर जानेवारीपासून कर्मचार्‍यांची सॅलरीत सुद्धा वाढेल. (7th Pay Commission)

 

भारतीय रेल्वे तांत्रिक पर्यवेक्षक संघ (RRTSA) आणि नॅशनल फेडरेशन ऑफ रेल्वेमेनकडून (NFIR) कर्मचार्‍यांचा एचआर वाढवण्याची मागणी करण्यात आली होती. ज्यावर आता विचार केला जात आहे. ज्यामुळे लवकरच हाऊस रेंट अलाऊन्स वाढू शकतो.

 

ही वाढ 1 जानेवारीपासून होऊ शकते. माहितीनुसार 18 महिन्यापासून प्रलंबित डीए देणेबाकी देण्याचा निर्णय अजूनही मोदी सरकारने घेतलेला नाही. परंतु लवकरच तो मिळण्याची आशा आहे. यासाठी, जारी एचआरएमध्ये (house rent allowance) वाढीसह DA थकबाकी दिली तर कर्मचार्‍यांच्या वेतनात दुप्पट फायदा होण्याची आशा आहे. (7th Pay Commission)

एचआरएचे वाटप कसे होते
ज्या शहराची लोकसंख्या 50 लाखापेक्षा जास्त असते ते ’X’ कॅटेगरीत येतात.
तर ज्याची लोकसंख्या 5 लाखापेक्षी जास्त असते ते ’Y’ कॅटेगरीत येतात.
आणि 5 लाखापेक्षा कमी लोकसंख्येच्या शहर ’Z’ कॅटेगरीत येते.
तिनही कॅटगरीसाठी मिनिमम HRA 5400, 3600 आणि 1800 रुपये असेल.
डिपार्टमेंट ऑफ एक्सपेंडिचरनुसार, जेव्हा डियरनेस अलाऊन्स 50 टक्केवर जाईल तेव्हा मॅक्सिमम House Rent Allowance वाढून 30 टक्के होईल.

 

आता किती मिळतो एचआरए
50 लाखोपक्षा जास्त लोकसंख्येची शहरे एक्स श्रेणी अंतर्गत येतात,
ज्यामध्ये कर्मचार्‍यांना हाऊस रेंट अलाऊन्स 27 टक्के मिळतो.
या दरम्या, श्रेणी Y आणि Z शहरांमध्ये, कर्मचार्‍यांना त्यांच्या मुळ वेतनाच्या अनुक्रमे 18% आणि 9% एचआरए मिळतो.

 

Web Title :- 7th Pay Commission | 7th pay commission increase in the salary of central employees after increase salary house rent allowance

 

Join our WhatsApp GroupTelegramfacebook page and Twitter for every update

 

हे देखील वाचा

PM Narendra Modi | पंतप्रधान मोदींचा काँग्रेसवर निशाणा, म्हणाले – ‘घराणेशाही जपणार्‍या पक्षांकडून लोकशाहीचे रक्षण होणार नाही’

Pune Cyber Crime | पुण्यात आरोग्य विभागाच्या पेपर फुटीप्रकरणी गुन्हा दाखल; 100 पैकी 92 प्रश्न सारखे असल्याचे तपासणीत निष्पन्न

Dhananjay Munde | पंकजाताईबाबत धनंजय मुंडेचं सुचक वक्तव्य; म्हणाले – ‘रुसून राहिले माझ्या जवळचे, मी कुणाला कळलोच नाही’

Modi Government | मोदी सरकारच्या ‘या’ योजनेचा 31 मार्चपर्यंत मिळेल लाभ; जाणून घ्या पूर्ण प्रक्रिया अन् कोणाला होणार फायदा

Stay Connected
534,500FansLike
125,687FollowersFollow
61,453SubscribersSubscribe
Must Read
Related News