7th Pay Commission | रेल्वे कर्मचार्‍यांना ‘या’ महिन्यात मिळेल मोठी रक्कम, 14 लाख लोकांना मिळेल थेट लाभ

नवी दिल्ली : वृत्तसंस्था – 7th Pay Commission | भारतीय रेल्वे (Indian Railway) च्या लाखो कर्मचारी आणि पेन्शनधारकांना लवकरच भरघोस पगार मिळणार आहे. केंद्र सरकारने सर्व केंद्रीय कर्मचार्‍यांचा महागाई भत्ता Dearness Allowance (DA) 31 टक्क्यांवरून 34 टक्के केला आहे. हा बदल जानेवारी 2022 पासून प्रभावी मानला जाईल. (7th Pay Commission)

 

याची अंमलबजावणी करून, रेल्वे मंत्रालयाने (Rail Ministry) आपल्या सर्व झोनला कर्मचारी आणि पेन्शनधारकांना वाढीव महागाई भत्ता (DA) देण्यास सांगितले आहे. यासोबतच जानेवारी, फेब्रुवारी आणि मार्च महिन्याची थकबाकीही भरण्यास सांगितले आहे.

 

या 14 लाख लोकांना मिळेल थेट लाभ
रेल्वे मंत्रालयाच्या या निर्णयाचा थेट फायदा भारतीय रेल्वेच्या 14 लाख कर्मचारी आणि पेन्शनधारकांना होणार आहे. आता त्यांना एप्रिलच्या पगारासोबत 34 टक्के दराने महागाई भत्ता मिळणार आहे. एवढेच नाही तर एप्रिलच्या पगारासोबतच जानेवारी ते मार्च महिन्याची थकबाकीही या 14 लाख लोकांना मिळणार आहे. (7th Pay Commission)

 

या संदर्भात, रेल्वे बोर्डाचे (Railway Board) उपसंचालक (सातवा वेतन आयोग), जय कुमार जी (Jaya Kumar G) यांनी मंगळवारी सर्व झोन आणि उत्पादन युनिटला पत्र जारी केले.

 

रेल्वे बोर्डाच्या उपसंचालकांनी पत्रात सूचना दिल्या
रेल्वे बोर्डाच्या उपसंचालकांनी पाठवलेल्या या पत्रात आता रेल्वे कर्मचार्‍यांना 1 जानेवारी 2022 पासून मूळ वेतनाच्या 31 टक्के ऐवजी 34 टक्के दराने महागाई भत्ता देण्यात यावा, असे म्हटले आहे.

 

या पत्रात म्हटले आहे की, सुधारित वेतन रचनेत मूळ वेतन म्हणजे वेतन मेट्रिक्समध्ये नमूद केल्याप्रमाणे ’प्राप्त पगार’ आहे.
उपसंचालकांनी पत्रात असेही म्हटले आहे की, मार्च 2022 च्या वेतन वितरणापूर्वी महागाई भत्त्याची थकबाकी देता येणार नाही.

या तारखेला दिली जाईल डीएची थकबाकी
ऑल इंडिया रेल्वे फेडरेशनचे सरचिटणीस शिव गोपाल मिश्रा यांनी म्हटले आहे की, 30 एप्रिल रोजी थकबाकीसह महागाई भत्ता दिला जाईल.
मिश्रा यांच्या म्हणण्यानुसार, सर्व संबंधित युनिट्सना उपसंचालकांच्या आदेशाची प्रत मिळाली आहे.
या आदेशानंतर आता 31 टक्क्यांऐवजी 34 टक्के दराने महागाई भत्ता दिला जाणार आहे.

 

Web Title :- 7th Pay Commission | 7th pay commission latest update railway employees and pensioners to get da hike

 

Join our WhatsApp GroupTelegramfacebook page and Twitter for every update

 

हे देखील वाचा

 

Sharad Pawar On Maharashtra Home Department | राष्ट्रवादी आपलं गृहखातं शिवसेनेला देणार ?; शरद पवारांनी जरा स्पष्टच सांगितलं…

 

Vaani Kapoor Hot Photo | वाणी कपूरनं फ्लॉन्ट केला बोल्ड अवतार, काळ्या रंगाच्या हॉट ड्रेसमध्ये सोशल मीडियावर केला कहर

 

PM Modi-Sharad Pawar Meeting | PM मोदींच्या भेटीनंतर भाजपसोबत जाणार का?; शरद पवारांचं मोठं वक्तव्य, म्हणाले…