7th Pay Commission | लाखो केंद्रीय कर्मचाऱ्यांना मोदी सरकारचा दणका, DA वाढीबाबत दिलं स्पष्टीकरण

नवी दिल्ली : वृत्तसंस्था – 7th Pay Commission | जर तुम्ही केंद्रीय कर्मचारी (Central Employee) असाल तर ही बातमी तुमच्यासाठी आहे. मोदी सरकारने (Modi Government) केंद्रीय कर्मचाऱ्यांना मोठा धक्का दिला आहे. मागील अनेक दिवसांपासून केंद्रीय कर्मचारी महागाई भत्त्यात वाढ (Increase in DA) करण्याची मागणी करत होते. मात्र, केंद्र सरकारने (Central Government) राज्यसभेत यावर स्पष्टीकरण दिले आहे. सरकारने केंद्रीय कर्मचाऱ्यांना आणि पेन्शनधारकांचा महागाई भत्त्यात (Dearness Allowanc) आणि महागाई दिलासा यात वाढ करत सुधारणा करण्यास स्पष्ट नकार दिला आहे. त्यामुळे केंद्रीय कर्मचाऱ्यांमध्ये निराशा पसरली आहे.(7th Pay Commission)

 

राज्यसभेत एका प्रश्नाला उत्तर देताना केंद्रीय अर्थ राज्यमंत्री पंकज चौधरी (Pankaj Chaudhary) यांनी सांगितले की, 3 टक्क्याहून अधिक महागाई भत्त्यात वाढ करण्याची गरज नाही. DA मध्ये वाढ होण्याबाबत मागील अनेक दिवसांपासून कर्मचारी मागणी करत आहेत. केंद्रीय श्रम मंत्रालयाने (Union Ministry of Labor) जारी केलेल्या अखिल भारतीय ग्राहक किंमत निर्देशांक (AICPI-IW) नुसार, महागाईच्या आधारावर DA आणि DR मध्ये वाढ केली जाईल. गेल्या दोन तिमाहीत महागाईचा दर 5 टक्क्यांहून अधिक असल्याचेही सरकारने संसदेत सांगितले.

 

DA वाढवण्याची योजना नाही
राज्यसभा खासदार नारन भाई जे राठवा (Rajya Sabha MP Naran Bhai J Rathwa)
यांनी मंगळवारी अर्थ राज्यमंत्र्यांना (Minister of State for Finance) विचारले होते की,
महागाईचा दर वाढला असताना केंद्र सरकारी कर्मचारी आणि पेन्शनधारकांच्या (Pensioners) महागाई भत्त्यात वाढ 3 टक्के स्थिर का ठेवली आहे?
मात्र याला उत्तर देताना पंकज चौधरी म्हणाले, डीएमध्ये 3 टक्क्यांपेक्षा जास्त वाढ करण्याचा सरकारचा विचार नाही.
केंद्रीय कर्मचारी आणि पेन्शनधारकांसाठी महागाई भत्ता आणि महागाई सवलतीच्या दरात सुधारणा करण्याची गरज नाही, असेही त्यांनी राज्यसभेत सांगितले.

लाखो कर्मचाऱ्यांची निराशा
केंद्रीय कर्मचाऱ्यांना 31 टक्के महागाई भत्ता दिला जातो.
होळीपूर्वी (Holi) त्यात 3 टक्क्यांनी वाढ केली असती तर एकूण महागाई भत्ता 34 टक्के झाला असता.
सरकारच्या या निर्णयामुळे 50 लाखांहून अधिक सरकारी कर्मचारी व 65 लाखांहून अधिक पेन्शनधारकांना फायदा झाला असता.
सातव्या वेतन आयोगाच्या (7th Pay Commission) शिफारशीच्या आधारे केंद्र सरकार DA वाढवते.
देशातील लाखो कर्मचारी डीए वाढण्याची वाट पाहात होते, मात्र त्यांची निराशा झाली आहे.

 

 

Web Title :- 7th Pay Commission | 7th pay commission modi government will not increase dearness allowance shock for central employees

 

Join our WhatsApp GroupTelegramfacebook page and Twitter for every update

 

हे देखील वाचा

 

CoronaVirus | चीन आणि काही यूरोपीय देशांत पुन्हा वेगाने वाढल्या कोरोना केस, केंद्रीय आरोग्य सचिवांनी सर्व राज्यांना पत्र पाठवून दिले हे निर्देश

 

Reduce Risk Of Heart Attack | ब्लड प्रेशर आणि हार्ट अटॅकचा धोका कमी करतील ‘ही’ 5 फळे, उन्हाळ्यात डाएटमध्ये करा समावेश

 

Diabetes Diet | ‘ही’ 2 हिरवी पाने डायबिटीजमध्ये शुगर लेव्हल कंट्रोल करण्यासाठी आहेत आश्चर्यकारक, होतात जबरदस्त फायदे