7th Pay Commission | सरकारी कर्मचाऱ्यांना केंद्राची भेट ! 18 महिन्यांपासून रखडलेल्या DA थकबाकीबाबत मोठं अपडेट आलं समोर

नवी दिल्ली : वृत्तसंस्था – 7th Pay Commission | केंद्रीय कर्मचाऱ्यांचा महागाई भत्ता 31 टक्के करण्यात आला आहे. त्याची अंमलबजावणी 1 जुलैपासून (7th Pay Commission) करण्यात आली आहे. याचा अर्थ सरकार आपल्या कर्मचाऱ्यांना 4 महिन्यांच्या महागाई भत्त्याची थकबाकीही देणार आहे. मात्र, 18 महिन्यांपासून प्रलंबित असलेल्या महागाई भत्त्याच्या थकबाकीबाबत अद्याप निर्णय झालेला नाही. ख्रिसमस आणि नवीन वर्षाच्या आधी डिसेंबर महिन्यात केंद्रीय कर्मचाऱ्यांच्या (Central staff) DA च्या थकबाकीबाबतही निर्णय घेतला जाण्याची शक्यता आहे.

 

केंद्रीय कर्मचाऱ्यांना खूशखबर –

7 व्या वेतन आयोगाअंतर्गत (7th Pay Commission) केंद्र सरकारने केंद्रीय कर्मचाऱ्यांना 31 टक्के डीए व्यतिरिक्त अनेक मोठे फायदे दिले आहेत. मात्र, डीए थकबाकीचे प्रकरण १८ महिन्यांपासून प्रलंबित आहे. नॅशनल कौन्सिल ऑफ जॉइंट कन्सल्टेटिव्ह मशिनरी (JCM) चे सचिव (Staff side) शिव गोपाल मिश्रा यांनी सांगितले की, डीए बहाल करताना 18 महिन्यांपासून प्रलंबित असलेल्या डीएच्या थकबाकीचे वन टाईम सेटलमेंट करावे, अशी मागणी परिषदेने सरकारसमोर केली आहे. डिसेंबर महिन्यात डीए थकबाकीबाबत कॅबिनेट सचिवांशी (Cabinet Secretary) चर्चा होण्याची शक्यता आहे.

 

DA ची थकबाकी एकरकमी –

अर्थ मंत्रालय, कार्मिक आणि प्रशिक्षण विभाग आणि खर्च विभागाच्या अधिकाऱ्यांसोबत संयुक्त सल्लागार यंत्रणा (JCM) ची बैठक होणार आहे. यामध्ये डीएची थकबाकी एकरकमी भरण्याची चर्चा होण्याची शक्यता आहे. मात्र, काही काळापूर्वी या प्रकरणात पंतप्रधान नरेंद्र मोदी (PM Narendra Modi) यांना हस्तक्षेप करण्याची मागणी पेन्शनधारकांनी केली होती. तेव्हा सरकारने त्यावर विचार करण्याचे आश्वासन दिले होते.

 

तुम्हाला DA ची थकबाकी किती मिळेल?

शिव गोपाल मिश्रा, सचिव, नॅशनल कौन्सिल ऑफ जॉइंट कन्सल्टेटिव्ह मशिनरी (जेसीएम) यांच्या मते, लेव्हल-1 कर्मचाऱ्यांची DA थकबाकी रुपये 11,880 ते 37 हजार रुपये असेल. त्याचबरोबर लेव्हल-13 कर्मचाऱ्यांना 1 लाख 44 हजार 200 रुपये ते 2 लाख 18 हजार 200 रुपये डीए थकबाकी म्हणून मिळतील. संसदेच्या पावसाळी अधिवेशनात केंद्र सरकारने महागाई भत्ता (DA) बहाल करण्यात येत असल्याचे स्पष्ट केले. (7th Pay Commission)

 

Web Title :- 7th Pay Commission | 7th pay commission news central govt employees will get da arrear payment dearness allowance

 

Join our WhatsApp GroupTelegramfacebook page and Twitter for every update

 

हे देखील वाचा