7th Pay Commission | सरकारी कर्मचाऱ्यांसाठी महत्त्वाची बातमी ! मोदी सरकारच्या ‘या’ निर्णयाने वेतनात होईल भरघोस वाढ

मुंबई : पोलीसनामा ऑनलाइन – 7th Pay Commission | केंद्रातील मोदी सरकारकडून (Modi Government) केंद्रीय कर्मचाऱ्यांसाठी (Central Government Employees) एक महत्त्वाची बातमी देण्यात आली आहे. या वर्षाच्या सुरुवातीला केंद्राच्या ताज्या महागाई भत्ता म्हणजे डीएमध्ये (DA) 3 टक्के वाढ झाल्यानंतर सातव्या वेतन आयोगाच्या (7th Pay Commission) अंतर्गत केंद्रीय कर्मचार्‍यांसाठी डीएचा आकडा 34 टक्के आहे. अखिल भारतीय ग्राहक किंमत निर्देशांक (All India Consumer Price Index-AICPI) च्या आधारावर DA दर ठरवला असल्याने ताज्या डेटामुळे आगामी वाढ 4 अथवा 5 टक्के असू शकते अशी चर्चा वाढलीय. तसेच, DA वाढीबरोबरच सरकारच्या कर्मचाऱ्यांना इतर भत्त्यांमध्ये देखील वाढ मिळण्याची शक्यता वर्तवली जात आहे.

 

सध्या सरकार अन्य चार भत्त्यांच्या दरात सुधारणा करण्याचा विचार करतेय. याचा विचार झाल्यास केंद्रीय कर्मचाऱ्यांना दिलासा मिळणार आहे. त्यामुळे कर्मचाऱ्यांच्या पगारात मोठी वाढ होण्याची शक्यता आहे. तसेच, कर्मचाऱ्यांचा प्रवास भत्ता आणि भरपाई (शहर) भत्ताही सुधारित केला जाऊ शकतो. केंद्राखालील कर्मचाऱ्यांना भविष्य निर्वाह निधी (Provident Fund) आणि ग्रॅच्युइटीमध्येही (Gratuity) वाढ होण्याची शक्यता आहे, ज्याची गणना मूळ पगार आणि डीएच्या आधारावर केली जातेय. या दरवाढीची घोषणा जुलैमध्ये केली जाणार असल्याची माहिती समोर येत आहे. (7th Pay Commission)

सरकारने अधिकृत निर्णय घेतल्यास सरकारी कर्मचाऱ्यांच्या वेतनात बंपर वाढ होईल.
तर डीए वाढीमुळे सरकार कर्मचाऱ्यांसाठी घरभाडे भत्ता (एचआरए) आणि टीए मधील वाढीचा मार्गही मोकळा होईल.
भत्ता सुधारणेच्या माध्यमातून हे अनेक फायदे एकाच वेळी मिळू शकतात.
तसेच, भविष्य निर्वाह निधी आणि ग्रॅच्युइटीही वाढ होणे अपेक्षित आहे.
केंद्रीय कर्मचार्‍यांचा मासिक पीएफ (PF) आणि ग्रॅच्युइटी मूळ पगार आणि डीएमधून मोजली जातेय.
अशा परिस्थितीमध्ये महागाई भत्त्यामध्ये वाढ झाल्यामुळे पीएफ आणि ग्रॅच्युइटीही वाढण्याची शक्यता आहे.

 

दरम्यान, पगार आणि भत्ता हा कर्मचाऱ्यांचा अधिकार असल्याचा सुप्रीम कोर्टाचा (Supreme Court) निर्णय असल्याचे कर्मचाऱ्यांचे म्हणणे आहे. अशा परिस्थितीत कर्मचाऱ्यांना 18 महिन्यांच्या थकबाकीचा लाभही मिळू शकतो. लक्षणीय आहे की कर्मचाऱ्यांचा महागाई भत्ता 9 महिन्यांत दुप्पट वाढ झाला आहे. आणि आता जुलैमध्ये पुन्हा DA वाढण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे.

 

Web Title :- 7th Pay Commission | 7th pay commission news good news for central government employees likely to get allowance bonanza

 

Join our WhatsApp Group, Telegram, facebook page and Twitter for every update

 

हे देखील वाचा