7th Pay Commission | लवकर वाढू शकतो DA, कोट्यवधी सरकारी कर्मचारी-पेन्शनर्सला होईल इतका फायदा; जाणून घ्या

नवी दिल्ली : वृत्तसंस्था – 7th Pay Commission | केंद्र सरकार लवकरच आपल्या 50 लाख कर्मचारी (Central Government Employees) आणि सुमारे 65 लाख पेन्शनधारकांच्या (Pensioners) महागाई भत्त्यात वाढ (DA Hike) करू शकते. ही वाढ 1 जुलैपासून केली जाऊ शकते आणि या लाखो लोकांना त्याचा थेट फायदा होऊ शकतो.

 

39 टक्के होऊ शकतो महागाई भत्ता
सरकार वर्षातून दोनदा महागाई भत्त्यात (Dearness Allowance) वाढ करते. पहिला जानेवारी ते जून या कालावधीसाठी होते, तर दुसरी जुलै ते डिसेंबर या कालावधीत होते. यावेळी सरकार कर्मचार्‍यांना (Govt. Employees) आणि पेन्शनधारकांना (Pensioners News) थेट महागाई भत्त्यात 5% वाढ (DA Hike) करू शकते. असे झाल्यास तो 34 टक्क्यांवरून 39 टक्क्यांपर्यंत वाढेल. (7th Pay Commission)

 

सरकार AICPI Index च्या आधारे महागाई भत्ता वाढवण्याचा निर्णय घेते. मार्च 2022 च्या आकडेवारीत या निर्देशांकात 1 अंकाची वाढ झाली आणि तो 126 अंकांवर पोहोचला. तेव्हापासून, सरकार जुलै – डिसेंबर या कालावधीसाठी महागाई भत्त्यात वाढ करेल अशी अपेक्षा आहे.

 

मात्र, एप्रिल, मे आणि जून 2022 चे AICPI आकडे येणे बाकी आहेत. जर तो मार्चच्या पातळीच्या वर राहिल्यास सरकारने महागाई भत्ता वाढणे जवळपास निश्चित आहे. अशीही, देशात महागाईची स्थिती अतिशय बिकट आहे. (Pension News)

एप्रिलमध्ये किरकोळ महागाईचा दर (Retail Inflation Rate) 7.79% च्या विक्रमी उच्चांकावर पोहोचला.
तर अन्नधान्य महागाईचा दर 8.38 टक्के होता. महागाईचा हा दर गेल्या 8 वर्षांच्या उच्च पातळीवर आहे.

 

इतका वाढेल पगार
केंद्र सरकारच्या कर्मचार्‍यांना जून 2017 पासून 7 व्या वेतन आयोगाचा (7th Pay Commission) लाभ मिळतो.
अशावेळी डीए 39 टक्क्यांपर्यंत वाढल्यास केंद्र सरकारी कर्मचार्‍यांच्या पगारात वाढ होण्याची खात्री आहे.

 

सध्या एखाद्या कर्मचार्‍याचा मूळ पगार 18,000 रुपये असेल, तर 34 टक्क्यांनुसार त्याचा महागाई भत्ता 6,120 रुपये होतो.
जर तो 39% असेल तर कर्मचार्‍याला 7,020 रुपये महागाई भत्ता मिळेल.
7th Pay Commission अंतर्गत कर्मचार्‍यांचे किमान मूळ वेतन 18,000 रुपये आहे.

 

Web Title :- 7th Pay Commission | 7th pay commission news govt may increase dearness allowance da hike in july salary

 

Join our WhatsApp Group, Telegram, facebook page and Twitter for every update

 

हे देखील वाचा