7th Pay Commission | खुशखबर ! वाढणार सरकारी कर्मचार्‍यांचा पगार ! फिटमेंट फॅक्टरबाबत आली मोठी अपडेट

नवी दिल्ली : वृत्तसंस्था – 7th Pay Commission | सणासुदीच्या काळात एकापाठोपाठ एक राज्ये आपल्या कर्मचार्‍यांना महागाई भत्त्यात (DA) वाढ करून भेट देत आहेत. अशावेळी डीए वाढीच्या (DA Hike) प्रतीक्षेत असलेल्या केंद्रीय कर्मचार्‍यांना (Central Govt Employee) सुद्धा लवकरच आनंदाची बातमी मिळण्याची अपेक्षा आहे. एकीकडे सरकार डीए वाढवण्याचा निर्णय घेऊ शकते, तर दुसरीकडे फिटमेंट फॅक्टर (Fitment Factor) वर मोठी घोषणा केली जाऊ शकते. फिटमेंट फॅक्टर वाढल्यास कर्मचार्‍यांच्या किमान मूळ वेतनात (Minimum Basic Salary) मोठी वाढ होईल. (7th Pay Commission)

 

दीर्घकाळापासून होतेय वाढीची मागणी
मीडिया रिपोर्टनुसार, दसर्‍यापूर्वी (Dasara) सरकार डीएसोबत फिटमेंट फॅक्टर वाढवण्याची घोषणा करून केंद्रीय कर्मचार्‍यांना दिवाळी भेट (Diwali Gift) देऊ शकते. कर्मचार्‍यांसाठी हा दुहेरी आनंद असेल. केंद्र सरकारचे कर्मचारी फिटमेंट फॅक्टर (Fitment Factor) मध्ये वाढ करण्याची मागणी अनेक दिवसांपासून करत आहेत. सध्या तो 2.57 टक्के आहे, तो वाढवून 3.68 टक्के करण्याचा प्रयत्न केला जात आहे. असे झाल्यास कर्मचार्‍यांचे किमान मूळ वेतन थेट 18,000 रुपयांवरून 26,000 रुपयांपर्यंत वाढेल. (7th Pay Commission)

 

डीएसह वाढू शकतो फिटमेंट फॅक्टर
नवीन आर्थिक वर्ष सुरू होण्यापूर्वी केंद्रीय कर्मचार्‍यांच्या फिटमेंट फॅक्टरमध्ये वाढ होण्याची अपेक्षा होती, मात्र तसे झाले नाही. आता पुन्हा एकदा दिवाळी किंवा दसर्‍यापूर्वी DA Hike सह फिटमेंट फॅक्टर वाढण्याची आशा निर्माण झाली आहे. मात्र, अशा चर्चेबाबत केंद्र सरकारकडून अद्याप कोणतेही अधिकृत निवेदन जारी करण्यात आलेले नाही.

फिटमेंट फॅक्टर म्हणजे काय? असे जाणून घ्या
फिटमेंट फॅक्टर सर्व केंद्रीय सरकारी कर्मचार्‍यांचा मूळ पगार ठरवतो. दुसर्‍या शब्दांत सांगायचे तर, कर्मचार्‍यांना मिळणार्‍या पगारामध्ये या फॅक्टरची सर्वात महत्त्वाची भूमिका असते. यामुळे केंद्रीय कर्मचार्‍यांच्या पगारात मोठी वाढ होत आहे, यावरून याचा अंदाज लावता येतो. शेवटच्या वेळी 2016 मध्ये फिटमेंट फॅक्टर वाढवण्यात आला होता. त्याच वर्षी सातवा वेतन आयोग लागू करण्यात आला होता.

 

मीडिया रिपोर्टनुसार, या महागाईच्या काळात सरकार कर्मचार्‍यांना दुहेरी आनंद देऊ शकते. यासाठी डीए वाढवण्याबरोबरच फिटमेंट फॅक्टरमध्ये वाढ करण्यावर गांभीर्याने विचार केला जात आहे. उल्लेखनीय म्हणजे, जेव्हा फिटमेंट फॅक्टर 2.57 टक्के वाढवण्यात आला होता, तेव्हा एंट्री लेव्हल बेसिक-पे 7,000 रूपये प्रति महिना वरून थेट 18,000 रुपये प्रति महिना करण्यात आला होता.

 

DA मध्ये 4% वाढीची शक्यता
वृत्तानुसार, केंद्रीय कर्मचार्‍यांच्या (Central Employees) डीएमध्ये महागाईच्या पार्श्वभूमीवर वाढीचा (DA Hike) निर्णय लवकरच घेतला जाऊ शकतो.
सरकारने मार्च 2022 मध्ये केंद्रीय कर्मचार्‍यांच्या डीएमध्ये शेवटची वाढ केली होती.
त्यानंतर कर्मचार्‍यांच्या डीएमध्ये 3 टक्के वाढ करण्यात आली होती.
त्यामुळे डीए 31 टक्क्यांवरून 34 टक्के झाला होता. आता त्यात 4 टक्क्यांनी वाढ होऊ शकते.

 

Web Title :- 7th Pay Commission | 7th pay commission news update central govt may hike fitment factor soon with da

 

Join our WhatsApp GroupTelegramfacebook page and Twitter for every update

 

हे देखील वाचा

 

Cardiac Arrest | माता पार्वती बनून नाचणार्‍या व्यक्तीला आला हार्ट अटॅक… स्टेजवरच मृत्यू, Video

 

Nashik ACB Trap | 3000 हजार रुपये लाच घेताना पोलीस कर्मचारी अ‍ॅन्टी करप्शनच्या जाळ्यात

 

NEET Exam Result | नीट परीक्षेत दुसऱ्यांदा कमी मार्क मिळाले, रोहिणीने जीवनयात्रा संपवली