7th Pay Commission | सरकारी कर्मचार्‍यांसाठी मोठी खुशखबर ! नववर्षापूर्वी ‘या’ कर्मचार्‍यांच्या पगारात होऊ शकते 95,000 रुपयांपर्यंत वाढ, समजून घ्या ‘कॅलक्युलेशन’

नवी दिल्ली : वृत्तसंस्था – 7th Pay Commission | मोदी सरकारने (Modi Government) लाखो कर्मचार्‍यांच्या महागाई भत्त्यात अलिकडेच वाढ केली होती. केंद्र सरकारने कर्मचार्‍यांना (Central Government Employees) 1 जुलैपासून DA मध्ये 28% ची वाढ केली होती आणि पुन्हा DA 28% वरून वाढवून 31% करण्याची घोषणा केली आहे. या वाढीसह केंद्र सरकारच्या कर्मचार्‍यांच्या वेतनात 95,000 रुपयांपर्यंत वाढ होण्याची शक्यता आहे. केंद्र सरकारच्या कर्मचार्‍याचे वेतन, मूळ वेतन आणि ग्रेडनुसार वाढते. (7th Pay Commission)

एक जुलैपासून महागाई भत्त्याचे होईल मूल्यांकन

केंद्र सरकारच्या घोषणेनंतर कर्मचार्‍यांच्या महागाई भत्त्यात (dearness allowance) एक जुलैपासून गणना केली जाईल. जुलैमध्ये 11 टक्के वाढ करून 28 टक्के केला होता, आता सरकारी कर्मचारी आणि पेन्शनर्सला (pensioners ) 31 टक्के डीए मिळेल. आणि याच मूल्यांकनावर कर्मचार्‍यांच्या सॅलरीत वाढ होईल.

 

पे ग्रेडवर वाढेल सॅलरी

केंद्र सरकारने कर्मचार्‍यांच्या DA त पुन्हा 3% वाढ केली आहे. आता केंद्र सरकारचे कर्मचारी आणि पेन्शनर्सला 31 टक्के दराने डीए आणि DR चे पेमेंट नवीन वर्षादरम्यान करेल. या हिशेबाने सरकारी कर्मचारी आणि पेन्शनर्स वाढलेल्या सॅलरीचा अंदाज ग्रेड पे (grade pay) वर लावू शकतात. (7th Pay Commission)

31 टक्के डीएवर कॅलक्युलेशन

लेव्हल 1 वर केंद्र सरकारच्या कर्मचार्‍यांचे वेतन 18000 रुपये ते 56900 रुपयांपर्यंत आहे आणि जर केंद्र सरकारच्या कर्मचार्‍याचे वेतन 18000 रुपये असेल, तर कर्मचार्‍याची वार्षिक वेतन वाढ 30,240 रुपये होईल.

 

* किमान मूळ वेतनावर गणना

कर्मचार्‍याचे मूळ वेतन – 18,000 रुपये

नवीन महागाई भत्ता (31%) – 5580रुपये / महिना

आतापर्यंत महागाई भत्ता (17%) – 3060 रुपये प्रति महिना

किती वाढला डीए – 2520 रुपये/महिना

वार्षिक वेतन वाढ = 30,240 रुपये होईल

 

* कमाल मूळ वेतनावर गणना

कर्मचार्‍याचे मूळ वेतन – 56900 रुपये

नवीन डीए (31%) – 17639 रुपये / महिना

आतापर्यंतचा महागाई भत्ता (17%)- 9673 रुपये/महिना

किती वाढला डीए – 7966 रुपये / महिना

वार्षिक वेतन वाढ 7966X12 – 95,592 रुपये होईल

डीएमध्ये 31 टक्के वाढीनुसार 56900 रुपयांच्या बेसिक सॅलरीवर एकुण वार्षिक डीए 211,668 रुपये होईल. परंतु, अंतराबाबत बोलायचे तर सॅलरीत वार्षिक 95,592 रुपयांची वाढ होईल.

 

Web Title :- 7th Pay Commission | 7th pay commission salary of central workers may increase by up to rs 95000 before new year Modi Government Central Government Employees DA DR

 

Join our WhatsApp GroupTelegramfacebook page and Twitter for every update

 

हे देखील वाचा

 

NCP | राष्ट्रवादी काँग्रेस व दीवा प्रतिष्ठानच्या वतीने शरद पवार यांच्या वाढदिवसानिमित्त ‘चित्र-शिल्प संवाद’ उपक्रमाचे आयोजन

Pune Crime | पुण्यात प्रचंड खळबळ ! काँग्रेस कार्यकर्त्याची पोलिस चौकीजवळ भरदिवसा 6 गोळ्या झाडून हत्या; कात्रज परिसरातील घटना

Indian Railways | ट्रेनमध्ये बर्थ झाला रिकामा तर तात्काळ येईल अलर्ट! मिळेल कन्फर्म सीट, जाणून घ्या IRCTC ची नवीन सुविधा