7th Pay Commission | ‘या’ सरकारी कर्मचार्‍यांच्या निवृत्तीच्या वयात होऊ शकते वाढ! जाणून घ्या कारण

नवी दिल्ली : वृत्तसंस्था – 7th Pay Commission | माजी आयएएस अधिकारी (Former IAS officer) के. मोहनदास (K. Mohandas) यांच्या अध्यक्षतेखाली गठीत 11व्या वेतन संशोधन आयोगाने आपला रिपोर्ट (11th Pay Research Commission Report) केरळ सरकारकडे सोपवला आहे. या रिपोर्टमध्ये सरकारी कर्मचार्‍यांच्या (7th Pay Commission) सेवानिवृत्तीचे वय सध्याच्या 56 वर्षावरून वाढवून 57 वर्ष करण्यासह अनेक शिफारसी केल्या आहेत (report makes recommendation, that raising the retirement age from the current 56 years to 57 year).

रिपोर्टमध्ये आयोगाने शिफारस केली आहे की, सरकार निवृत्तीच्या रांगेत असलेल्या कर्मचार्‍यांचे सेवानिवृत्तीचे वय एक वर्षापर्यंत वाढवू शकते.
यातून निवृत्त होणार्‍या कर्मचार्‍याला सरकारकडून मिळणारी रक्कम काही काळासाठी होल्ड केली जाऊ शकते.

रिपोर्टमध्ये म्हटले आहे की, अनेक इतर राज्यांमध्ये निवृत्तीचे वय आपल्या तुलनेत जास्त आहे.
राज्यात प्रत्येक वर्षी सुमारे 20,000 कर्मचारी निवृत्त होतात.
निवृत्तीचे वय एक वर्षाने वाढवल्यास सरकारला निवृत्त कर्मचार्‍यांना दिल्या जाणार्‍या आर्थिक फंडच्या बाबतीत अस्थायी दिलासा मिळेल.

आयोगाने अशी देखील शिफारस केली की, सरकारने सोमवार ते शुक्रवारपर्यंत पाच दिवस वर्किंगचे पालन केले पाहिजे.
आणि असे करताना, ऑफिसची वेळ एक तासासाठी (सकाळी 9:30 वाजेपासून सायंकाळी 5:30 वाजेपर्यंत) वाढवली पाहिजे.
सध्याच्या व्यवस्थेअंतर्गत ऑफिसची वेळ सकाळी 10 वाजेपासून सायंकाळी 5 वाजेपर्यंत आहे.

आयोगाने शिफारस केली आहे की, मदत प्राप्त संस्थांमध्ये सरकारी वेतन घेणार्‍या शिक्षकांची निवड पात्रतेच्या आधारावर केली गेली पाहिजे. त्यांची निवड पारदर्शक व्हावी.
अशा शैक्षणिक संस्थाच्या नियोजनाच्या मदतीने खासगी शाळा आणि कॉलेजांसाठी केरळ भरती बोर्डाची स्थापना केली पाहिजे.

Web Title : 7th Pay Commission | 7th pay commission there may be an increase in the retirement age of these government employees know what is the whole matter

Join our WhatsApp GroupTelegramfacebook page and Twitter for every update