7th Pay Commission : केंद्रीय कर्मचाऱ्यांच्या खात्यात येणार ९५,०००!; मोदी सरकारची नववर्षातील भेट

नवी दिल्ली : केंद्र सरकारच्या कर्मचाऱ्यांसाठी (Central Government Employees) एक आनंदाची बातमी आहे. कर्मचाऱ्यांच्या पगारात लवकरच बंपर वाढ होणार आहे. मीडिया रिपोर्टनुसार, सरकार कर्मचाऱ्यांच्या पगारावर मोठा निर्णय घेऊ शकते, त्यानंतर पगारात थेट ९५,००० रुपयांची वाढ होणार आहे. विशेष म्हणजे कर्मचाऱ्यांच्या पगारातील ही वाढ एकरकमी असेल. यावेळी नवीन वर्षात कर्मचाऱ्यांना मोठी भेट देण्याचा मोदी सरकारचा विचार आहे (7th Pay Commission Update).

बजेटमध्ये फिटमेंट फॅक्टर होऊ शकतो रिवाईज
यासोबतच वृत्त आहे की या बजेटमध्ये सरकार फिटमेंट फॅक्टर रिवाईज करू शकते. सध्या याबाबत कोणतीही अधिकृत माहिती मिळालेली नाही. सध्या कर्मचाऱ्यांना २.५७ नुसार फिटमेंट फॅक्टर मिळतो, तो ३.६८ पर्यंत वाढवण्याची मागणी केली जात आहे. असे झाल्यास कर्मचाऱ्यांचे किमान वेतन थेट १८,००० रुपयांवरून २६,००० रुपयांपर्यंत वाढेल.

कशा प्रकारे होईल कॅलक्युलेशन?
कॅलक्युलेशनबद्दल बोलायचे तर जर तुमचा किमान पगार १८,००० रुपये असेल, तर इतर सर्व प्रकारचे भत्ते वगळून, तुम्हाला २.५७ नुसार फिटमेंट फॅक्टरचे ४६२६० रुपये मिळत आहेत. दुसरीकडे जर सरकारने बजेटमध्ये याच्यात वाढ केली तर तो ३.६८ होऊ शकतो, ज्याचे कॅलक्युलेशन २६,००० रुपयांच्या मूळ वेतनावर केले जाईल.

खात्यात येतील ९५६८० रुपये
२६,००० रुपयांच्या पगारानुसार, ३.६८ वर फिटमेंट फॅक्टरचे कॅलक्युलेशन केले तर यानुसार कर्मचाऱ्यांना एकरकमी ९५६८० रुपये मिळतील. कर्मचाऱ्यांच्या पगारात बंपर वाढ होणार असून, एकाच वेळी खात्यात पैसे ट्रान्सफर केले जाऊ शकतात.

मागच्या वेळी किती वाढला होता पगार?
मागच्या वेळी केंद्र सरकारने फिटमेंट फॅक्टर वाढवल्यानंतर कर्मचाऱ्यांचे पगार तीन पटीने वाढले होते.
कर्मचाऱ्यांचा पगार थेट ६००० वरून १८००० पर्यंत वाढला होता.
यावेळी सरकारने कर्मचाऱ्यांची मागणी मान्य केल्यास पगार १८ हजारांवरून वाढून २६ हजार होईल.

Web Title :-  7th Pay Commission | 7th pay commission update on fitment factor employees may get 95k in new year

Join our WhatsApp GroupTelegramfacebook page and Twitter for every update

हे देखील वाचा

Traffic Police | आता अल्पवयीनांना गाडी चालवताना होणार ‘इतक्या’ रुपयांचा दंड

Pakistan Webseries | सोशल मीडियावर होतोय ‘या’ पाकिस्तानी वेबसीरिजला प्रचंड विरोध; पहिला भाग युट्यूबवर प्रदर्शित