शिक्षक व शिक्षकेतर कर्मचार्‍यांना 7 व्या वेतन आयोगाची थकबाकी 5 हप्त्यांत

मुंबई : पोलीसनामा ऑनलाइन – शिक्षकांसाठी मोठी खुशखबर आहे. खासगी शाळांमधील शिक्षक व शिक्षकेतर कर्मचाऱ्यांना सातव्या वेतन आयोगाची थकबाकी देण्यात येईल, अशी माहिती शालेय शिक्षणमंत्री वर्षा गायकवाड यांनी दिली आहे. 1 जानेवारी 2016 ते 31 डिसेंबर या काळातील थकबाकी देण्यात येणार असून ती पाच हप्त्यांमध्ये देण्यात येणार आहे.

याचा लाभ हा खासगी अनुदानित प्राथमिक, माध्यमिक, उच्च माध्यमिक, कनिष्ठ महाविद्यालये, अध्यापक विद्यालये व सैनिकी शाळांतील पूर्णवेळ शिक्षक-शिक्षकेतर कर्मचारी, नगर परिषद, नगरपंचायती, महापालिका यामधील शिक्षक, शिक्षकेतर कर्मचारी व अर्धवेळ शिक्षक, शिक्षकेतर कर्मचारी यांना होणार आहे. तसेच पीएफ योजनेमध्ये असलेल्यांची थकबाकी ही थेट त्यांच्या खात्यामध्ये जमा होणार आहे, तर इतरांना ती रोखीने मिळणार आहे.

फेसबुक पेज लाईक करा – https://www.facebook.com/policenama/