7th Pay Commission : लाखो केंद्रीय कर्मचार्यांना मोठा दिलासा ! आता PF संबंधी प्रकरणात मिळेल ‘ही’ नवीन सुविधा
नवी दिल्ली : केंद्रीय कर्मचार्यांसाठी खुशखबर आहे. केंद्र सरकारने आज कर्मचार्यांसाठी नवीन ऑनलाइन सुविधा लाँच केली आहे. यानंतर आता पीएफ संबंधी प्रकरणी अर्ज आणि निराकरण करणे सोपे होईल. ही सुविधा रेल्वेच्या कर्मचार्यांना देण्यात आली आहे. या लाँचिंगनंतर आता देशातील लाखो रेल्वे कर्मचार्यांना थेट पद्धतीने नव्या सुविधेचा फायदा मिळेल.
भारतीय रेल्वेने गुरुवारी पूर्णपणे डिजिटल ऑनलाइन मनुष्यबळ व्यवस्थापन प्रणाली (एचआरएमएस) च्या अंतर्गत तीन मॉड्यूल्स लाँच केले आहेत. हे तीन मॉड्यूल कर्मचारी स्वयंसेवा (ईएसएस), प्रोव्हिडेंट आणि सेटलमेंट मॉड्यूल आहेत. या लाँचिंगमधून आता कार्यरत आणि सेवानिवृत्त कर्मचारी सहजपणे आपला पीएफ बॅलन्स चेक करू शकतात आणि पीएफ अॅडव्हान्ससाठी अर्ज करू शकतात.
रेल्वे बोर्डाचे अध्यक्ष, व्ही. के. यादव यांनी व्हिडिओ कॉन्फरन्सिंगच्या माध्यमातून गुरुवारी रेल्वे कर्मचारी आणि पेन्शनर्ससाठी उपयोगी एचआरएमएस आणि यूजर डिपोचे खालील मॉड्यूल लाँच केले आहेत.
Shri Vinod Kumar Yadav, Chairman & CEO, Railway Board has launched today three new modules of HRMS namely Employee Self Service, Provident Fund Advance, Settlement & User Depot Module.
These modules will improve productivity & employee satisfaction.https://t.co/s1lDFxWb1Z pic.twitter.com/o0XT5XN4Sz
— Ministry of Railways (@RailMinIndia) November 26, 2020
कर्मचारी स्वयंसेवा (ईएसएस) मॉड्यूल रेल्वे कर्मचार्यांना डेटा बदलण्याबाबत एचआरएमएसच्या विविध मॉड्यूलसह इंटरॅक्ट करण्यात सक्षम बनवते. प्रोव्हिडेंट फंड (पीएफ) अॅडव्हान्स मॉड्यूलच्या माध्यमातून रेल्वे कर्मचारी आपला पीएफ बॅलन्स पाहू शकतील आणि पीएफ अॅडव्हान्ससाठी ऑनलाइन अर्ज करू शकतील. सेटलमेंट मॉड्यूलमधून सेवानिवृत्त होणार्या कर्मचार्यांसाठी सर्व रक्कम देण्याची प्रक्रिया डिजिटल झाली आहे. कर्मचारी ऑनलाइनद्वारे सेटलमेंट/पेन्शन बुकलेट भरू शकतात. सर्व्हिस आणि माहिती ऑनलाइन प्राप्त करता येऊ शकते आणि पेन्शनचे पूर्ण काम ऑनलाइन होते. यामुळे कागदाचा वापर कमी होईल. तसेच सेवानिवृत्त होत असलेल्या कर्मचार्यांना देण्यात येणार्या रक्कमांच्या प्रक्रियेचे मॉनिटरिंग होऊ शकते.