7 वा वेतन आयोग : केंद्रीय अर्थसंकल्प 2020 नंतर नोकरदारांना मिळणार खुशखबर ! पगारात 10 हजारापर्यंत मिळणार ‘इंक्रीमेंट’

नवी दिल्ली : वृत्तसंस्था – 7 व्या वेतन आयोगाअंतर्गत वेतनात वाढ होण्याची वाट पाहणाऱ्या लाखो केंद्रीय कर्मचाऱ्यांना आणि पेंशनर्सला मोठा दिलासा मिळाला आहे. वेतनात वाढ होण्याची खुशखबर लवकरच मिळणार आहे. कर्मचाऱ्यांच्या महागाई भत्त्यात वाढीचे गिफ्ट मिळणार आहे. मिळालेल्या वृत्तनुसार अर्थसंकल्प 2020 नंतर 1.1 कोटी केंद्रीय कर्मचाऱ्यांना आणि पेंशनर्ससह राज्यांच्या कर्मचाऱ्यांना देखील महागाई भत्त्याची घोषणा करण्यात येईल.

अर्थसंकल्पात कर्मचाऱ्यांना मिळणार खुशखबर –
केंद्रीय कर्मचाऱ्यांना अर्थसंकल्पामध्ये खुशखबर मिळण्याची शक्यता आहे. 28 फेब्रुवारी 2020 नंतर केंद्र सरकार महागाई भत्त्यात वाढ होण्याची घोषणा होऊ शकते. 1 फेब्रुवारीला सरकार अर्थसंकल्प सादर करेल. यानंतर कर्मचाऱ्यांना महागाई भत्ता देखील मिळणार आहे. अपेक्षा आहे की यावर्षी डीएमध्ये 4 टक्क्यांनी वाढ होईल.

1.1 कोटी कर्मचाऱ्यांना फायदा –
महागाई भत्त्यात सरकारने केलेल्या वाढीत 1.1 कोटी कर्मचाऱ्यांना आणि पेंशनरबरोबर राज्य कर्मचाऱ्यांना फायदा मिळेल. जर यावर्षी डीएवर 4 टक्के वाढीची मोहर लागते तर कर्मचाऱ्यांचा महागाई भत्ता 17 टक्क्यांवरुन 21 टक्के वाढू शकतो. ही वाढ जुलै 2019 पासून डिसेंबर 2019 साठी असेल.

किती वाढणार वेतन –
नोव्हेंबरमध्ये उपभोक्ता मूल्य आकडेकवारी 328 झाली होती. त्यानुसार डीएमध्ये 4 टक्क्यांनी वाढ निश्चित झाली आहे. परंतु डिसेंबरच्या आकडेवारीनुसार 12 अंक कमी होतो, तर डीए मध्ये चार टक्के कमी होऊ शकतो, परंतु मागील दीड वर्षात असे झाले नाही. अशात 4 टक्के वाढ निश्चित आहे. डीएमध्ये 4 टक्के वाढ झाल्याने लेवल 1 स्तराच्या कर्मचाऱ्यांच्या वेतनात 720 रुपयांनी वाढ होईल. तर कॅबिनेट सचिव स्तरावरील आधिकाऱ्यांच्या पगारात 10000 रुपयांची वाढ होईल.

गुजरात सरकारने दिले गिफ्ट –
गुजरात सरकारने आपल्या 10 लाख कर्मचाऱ्यांना गिफ्ट दिले आहे. गुजरात सरकारने डीएमध्ये 5 टक्के वाढ केली आहे. आता या कर्मचाऱ्यांना 17 टक्के डीए मिळेल. डीएशिवाय कर्मचाऱ्यांना ट्रांसपोर्ट अलाऊंसमध्ये देखील वाढ करुन मिळेल.

फेसबुक पेज लाईक करा – https://www.facebook.com/policenama/