7th pay commission | 2022 ची सर्वात मोठी आनंदाची बातमी, महागाई भत्त्यात 14 टक्के वाढीची घोषणा

नवी दिल्ली : वृत्तसंस्था – 7th pay commission | केंद्र सरकारच्या कर्मचाऱ्यांना (central government employees) 2022 मध्ये सर्वात मोठी भेट मिळाली आहे. त्यांच्या महागाई भत्त्यात, DA मध्ये 14 टक्क्यांची बंपर वाढ झाली आहे. याची घोषणाही सरकारने (7th pay commission) केली असून, ही भेट सेंट्रल पब्लिक सेक्टर एंटरप्रायझेस (CPSEs) च्या कर्मचाऱ्यांना मिळाली आहे.

 

DA दर आता 184.1% पर्यंत केला
अंडर-सेक्रेटरी सॅम्युअल हक (Samuel Haque) यांच्या मते, CPSEs च्या बोर्ड स्तर आणि बोर्ड स्तरावरील अधिकारी व पर्यवेक्षकांना मिळणारे DA दर सुधारित करण्यात आले आहेत. 2007 च्या वेतनश्रेणी अंतर्गत CPSEs चे अधिकारी आणि गैर-संघीय पर्यवेक्षकांना मिळणारा DA चा दर पूर्वी तो 170.5% होता व आता 184.1% पर्यंत करण्यात आला आहे.

 

सरकारी कर्मचाऱ्यांचा महागाई भत्ता थकवला
मार्च 2020 मध्ये कोविड महामारी (Covid-19) सुरू झाल्यानंतर सरकारी कर्मचाऱ्यांचा महागाई भत्ता थकीत ठेवण्यात आला होता.
जुलै 2021 मध्ये सरकारने महागाई भत्त्यात वाढ (DA Hike) करण्याची घोषणा केली.
यानंतर 7 व्या वेतनश्रेणीत (7th pay commission) मिळणाऱ्या केंद्रीय कर्मचाऱ्यांच्या डीएमध्ये थेट 11 टक्क्यांनी वाढ करण्यात आली होती. त्याच वेळी, CPSEs मध्ये 2007 च्या वेतनश्रेणीचा DA देखील वाढवण्यात आला होता.

महागाई भत्ता थेट 159.9% वरून 170.5% पर्यंत वाढला
एजी ऑफिस ब्रदरहुडचे माजी अध्यक्ष एचएस तिवारी (H.S Tiwari) यांनी सांगितले की त्यांचा महागाई भत्ता थेट 159.9% वरून 170.5% वर गेला आहे.
यामध्ये सुमारे 11 टक्के वाढ झाली आहे. 01 ऑक्टोबर 2020 ते 30 जून 2021 या कालावधीसाठी महागाई भत्त्याचा दर 159.9% असेल अशीही माहिती देण्यात आली होती.
डीएचा हा दर IDA (Industrial Dearness Allowance) कर्मचाऱ्यांच्या बाबतीत लागू होईल ज्यांना DPE नुसार सुधारित वेतनश्रेणी (2007) मंजूर करण्यात आली आहे.

 

वेगळा महागाई भत्ता
एचएस तिवारी यांच्या म्हणण्यानुसार, सरकारी कर्मचाऱ्यांना पगाराच्या आधारावर डीए मिळतो.
उदाहरणार्थ, शहरी, निमशहरी आणि ग्रामीण भागात काम करणाऱ्यांसाठी महागाई भत्त्याचा दर वेगळा आहे.

 

Web Title :- 7th pay commission | Biggest dearness allowance hike good news for central government employees 7th pay commission news

 

Join our WhatsApp GroupTelegramfacebook page and Twitter for every update

 

हे देखील वाचा

 

Pune ACP Transfer | पुण्यातील 3 सहाय्यक आयुक्तांच्या अंतर्गत बदल्या; ACP आरती बनसोडे आणि रमेश गलांडे यांचा समावेश

 

PMC Draft ward Structure | पुणे महापालिकेच्या प्रारुप प्रभाग रचनेच्या 58 प्रभागांची नावे

 

Coronavirus in Maharashtra | दिलासादयक! राज्यात नव्या रुग्णांपेक्षा बरे होणाऱ्यांची संख्या अधिक, गेल्या 24 तासात ‘कोरोना’चे 15,140 नवे रुग्ण, जाणून घ्या इतर आकडेवारी