7 वा वेतन आयोग : ‘या’ सरकारी कमर्चाऱ्यांचा पगार वाढणार 1 लाख रुपयांनी, 4 वर्षांचा फरक देखील मिळणार

नवी दिल्ली : वृत्तसंस्था – सातव्या वेतन आयोगाच्या शिफारशींनंतर वेतन वाढीच्या प्रतीक्षेत असलेल्या केंद्रीय कर्मचाऱ्यांच्या दैनिक भत्त्यामध्ये वाढ केल्याची घोषणा केंद्र सरकारने केली आहे. जवळपास 50 लाख सरकारी कर्मचाऱ्यांना याचा फायदा मिळणार असून महागाई भत्त्यामध्ये देखील 5 टक्क्यांची वाढ करण्यात आली आहे. त्याचबरोबर उत्तरप्रदेश सरकारने देखील आपल्या कर्मचाऱ्यांना दिवाळीच्या तोंडावर बक्षीस दिले असून कर्मचाऱ्यांच्या वेतनात वाढ केली आहे. त्यामुळे त्यांच्या वेतनात जवळपास 1 लाख रुपयांपर्यंत वाढ होणार आहे.

या कर्मचाऱ्यांचे वाढणार वेतन
उत्तरप्रदेश सरकारने मेडिकल कॉलेजमधल्या डॉक्टरांना सातव्या वेतन आयोगाचा लाभ दिला असून यापुढे त्यांना सातव्या वेतन आयोगानुसार वेतन मिळणार आहे. तसेच हि वाढ त्यांना 1 जानेवारी 2016 पासून लागू होणार आहे. त्यामुळे या डॉक्टरांना मोठा फायदा होणार आहे.

1300 डॉक्टरांचा वाढणार लाखांपर्यंत वेतन
सरकारच्या या निर्णयामुळे सरकारी रग्णालयांतील 1300 डॉक्टरांचे आणि इतर कर्मचाऱ्यांचे वेतन वाढणार आहे. त्यामुळे जवळपास1300 कर्मचाऱ्यांना लाखाच्या वर ह वेतनवाढ मिळणार आहे.

86000 रुपयांपर्यंत वाढणार वेतन
या निर्णयामुळे जुनिअर रेजिमेंट डॉक्टरांचे वेतन हे 65,000 रुपयांवरून 86000 रुपयांपर्यंत वाढणार आहे. त्याचबरोबर सिनिअर रेजिमेंट डॉक्टरांचे वेतन हे 80,000 रुपयांवरून 1 लाख 2 हजार रुपयांपर्यंत वाढणार आहे. त्याचबरोबर इतर कर्मचाऱ्यांच्या वेतनामध्ये देखील मोठी वाढ होणार आहे.

Visit : Policenama.com