7th Pay Commission : केंद्रीय कर्मचार्‍यांना लवकरच मिळू शकते ‘ही’ भेट, पेन्शनर्सला सुद्धा !

नवी दिल्ली : वृत्तसंस्था – कोरोना संकटामुळे केंद्रीय कर्मचार्‍यांना आणि पेन्शनर्सला कमी दराने महागाई भत्ता (डीए) दिला जात आहे. कर्मचारी आणि पेन्शनर्सला सध्या 21 टक्केऐवजी 17 टक्केच्या दराने डीए मिळत आहे. कर्मचारी आणि पेन्शनर्सला आशा आहे की, लवकरच सरकार डीएबाबत दिलासा देऊ शकते.

मागच्या वर्षी मार्चमध्ये सरकारने महत्वाचा निर्णय घेत डीए वाढीवर दिड वर्षासाठी स्थगिती लावली होती. अशावेळी डीए जून 2021 पर्यंत जुन्या दराने देण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. या डेडलाइनजवळ आल्यानंतर कर्मचार्‍यांसह पेन्शनर्सला सुद्धा आशा आहे की, सरकार लवकरच याबाबत दिलासा देऊ शकते. तर काही मीडिया रिपोर्टमध्ये दावा केला जात आहे की, होळीच्या पूर्वी सरकार डीएबाबत एखादी मोठी घोषणा करू शकते. जर असे झाले तर कर्मचार्‍यांना पगार वाढवून मिळेल आणि पेन्शनर्सला पेन्शन.

दरम्यान, सरकारने फॅमिली पेन्शनची मर्यादा 45 हजार रुपयांनी वाढवून 1.25 लाख रुपये प्रति महिना केली आहे. पेन्शन आणि पेन्शनधारक कल्याण विभागाने मृत सरकारी सेवक/ पेन्शनधारकाचे ती मुले/भाऊ-बहिण यांच्या पेन्शन बाबत निर्देश जारी केले आहेत. कौटुंबिक पेन्शन योजना 1971 मध्ये ही तरतूद आहे की, कर्मचार्‍याचा सर्व्हिस पिरियड दरम्यान मृत्यु झाल्यास कौटुंबिक पेन्शन प्रामुख्याने कर्मचार्‍याची विधवा किंवा विधुर यांना दिली जाते. सरकारने या पेन्शनमध्ये अडीचपट वाढ केली आहे. कर्मचार्‍यांद्वारे मोठ्या कालावधीपासून ही मागणी केली जात होती.