7th Pay Commission | जुलैपासून वाढू शकते केंद्र सरकारच्या स्टाफची सॅलरी, जाणून घ्या दरमहिना किती वाढेल वेतन

नवी दिल्ली : वृत्तसंस्था – 7th Pay Commission | 1 जुलैपासून केंद्र सरकारी कर्मचार्‍यांच्या (Central Government Employees) पगारात बंपर वाढ होण्याची शक्यता आहे (Salary Hike). तुम्हीही सरकारी कर्मचारी असाल तर तुमचा पगार किती वाढणार आहे हे तुम्ही लगेच तपासू शकता. (7th Pay Commission)

 

देशातील लाखो केंद्रीय कर्मचार्‍यांसाठी मोठी बातमी आली आहे. तुम्हीही पगार वाढण्याची वाट पाहत असाल तर लवकरच तुमचा पगार वाढणार आहे. केंद्र सरकारने सांगितले आहे की, 1 जुलैपासून केंद्र सरकारी कर्मचार्‍यांच्या पगारात मोठी वाढ होऊ शकते.

 

1 जुलैपासून कर्मचार्‍यांचा महागाई भत्ता (DA) वाढणार आहे. आतापर्यंत सरकारी कर्मचार्‍यांना 34 टक्के डीए मिळत होता (DA Hike), जो जुलैपासून 38 टक्के होईल. केंद्र सरकारने डीएमध्ये चार टक्के वाढ केली आहे. (7th Pay Commission)

 

कर्मचार्‍यांना जुलै महिन्याच्या पगारात वाढीव रक्कम मिळू शकते. तुमचा पगार किती वाढेल हे तुम्हालाही समजून घ्यायचे असेल, तर ते एका उदाहरणाद्वारे समजून घेवूयात…

 

बेसिक सॅलरीच्या हिशेबाने कॅलक्युलेशन

मूळ वेतन : रु. 56,900
सध्याचा डीए (34%) : 19,346 रुपये
नवीन डीए (38%) : रु. 21,622
डीएमध्ये मासिक वाढ : रु. 2,276
पगार किती वाढेल : 27,312

 

वाढत्या महागाईच्या काळात केंद्र सरकार कर्मचार्‍यांच्या डीएमध्ये वाढ करू शकते. अखिल भारतीय ग्राहक किंमत निर्देशांकानुसार, सरकार डीए 4 टक्क्यांनी वाढवू शकते.

 

AICPI डेटानुसार, हा आकडा जानेवारीमध्ये 125.1 होता, तर फेब्रुवारीमध्ये तो 125 होता. जर आपण यावर्षी मार्चबद्दल बोललो तर या महिन्यात तो 126 पर्यंत वाढला आहे. एप्रिल आणि मे महिन्यात तो 126 वर गेला तर सरकारकडून डीएमध्ये 4% वाढ होईल.

 

केंद्र सरकारनंतर अनेक राज्यांनीही डीए (Dearness Allowance) वाढवला आहे.
अनेक राज्यांतील कर्मचार्‍यांचा महागाई भत्ताही केंद्रीय कर्मचार्‍यांच्या बरोबरीने 34 टक्क्यांवर पोहोचला आहे.
बातमी येत आहे की, महाराष्ट्र सरकार आपल्या कर्मचार्‍यांना 34 टक्के डीए देऊ शकते.

 

Web Title :- 7th Pay Commission | central employees to get increased salary from july 1 know details

 

Join our WhatsApp Group, Telegram, facebook page and Twitter for every update

 

हे देखील वाचा