7 वा वेतन आयोग : ‘प्रमोशन’ झाल्यानंतर कधी मिळणार पगार’वाढ’ ? सरकारनं दूर केला ‘संभ्रम’, जाणून घ्या

नवी मुंबई ; पोलीसनामा ऑनलाईन : केंद्रीय कर्मचाऱ्यांना बढती (प्रमोशन) मिळाल्यानंतर त्यांच्यात पगारवाढीसंदर्भात संभ्रम निर्माण झाला होता. कर्मचाऱ्यांना प्रश्न पडला होता की बढती मिळाल्यानंतर देखील पगारवाढ का होत नाही. तर कर्मचाऱ्यांच्या या शंकांचे सरकारकडून निरसन करण्यात आले आहे. सरकारने स्पष्ट केले की, जर कर्मचाऱ्याला २ जानेवारी ते ३० जूनच्या दरम्यान बढती मिळाली असेल तर त्यास १ जानेवारीपासून वाढीव पगार मिळणार आहे.

एखाद्या कर्मचाऱ्याला बढती मिळाल्यानंतर त्याच्या पगारात वाढ केली जाते. त्यामुळेच पगारवाढीसंदर्भात कर्मचाऱ्यांमध्ये संभ्रम निर्माण झाला होता. बढती मिळाल्यानंतर पगारवाढ होण्यासाठी नेमकी कोणती तारीख ग्राह्य धरली जाईल, यावरून कर्मचाऱ्यांमध्ये प्रचंड गोंधळाचे वातावरण होते. परंतु आता केंद्र सरकारनं हा गोंधळ दूर केला असून, अर्थ मंत्रालयाच्या खर्च विभागानं यावर स्पष्टीकरणं दिले आहे. याने कर्मचाऱ्यांमध्ये असणारा गोंधळ दूर झाला आहे.

खर्च विभागाने स्पष्ट केले आहे की कर्मचाऱ्याला सहा महिन्यांची सेवा पूर्ण झाल्यानंतरच पगारवाढ दिली जाणार आहे. मग त्या कर्मचाऱ्याला प्रमोशन १ जानेवारीला मिळो अथवा १ जुलैला, जी तारीख आधी येते त्यावर हे अवलंबून असणार आहे. कर्मचाऱ्यांना बढती देताना अथवा पगार वाढ करताना तारीख निवडण्याबाबत दोन पर्याय समोर असतात. त्या पर्यायांच्या आधारावर कर्मचाऱ्यांना लाभ देत असतात.

सरकारने बढती संदर्भाच्या नियमात बदल केले आहेत, पूर्वी १०, २० आणि ३० वर्षांची सेवा पूर्ण झाल्यानंतर कर्मचाऱ्यांना बढती देण्यात येत होती. मात्र आता कामाचे मूल्यमापन करून बढती देण्यात येते. सरकारनं पगारवाढीसंदर्भातील संभ्रम दूर केला असला तरी अजून जवळपास ५० लाखांहून अधिक कर्मचाऱ्यांच्या मागण्या अजून पूर्ण झालेल्या नाहीत. विशेष म्हणजे सरकारनं फिटमेंठ फॅक्टर वाढवून मूळ वेतन २६ हजार इतक ठेवावं अशी मागणी मोठ्या प्रमाणात केली जात आहे. विशेष म्हणजे जर सरकारनं ही मागणी मान्य केली तर कर्मचाऱ्यांच्या पगारात तब्बल आठ हजारांची वाढ होईल.

फेसबुक पेज लाईक करा – https://www.facebook.com/policenama/