7th Pay Commission | DA वाढल्यानंतर सप्टेंबरमध्ये केंद्रीय कर्मचार्‍यांना किती मिळणार पगार? लगेचच तपासा, जाणून घ्या

नवी दिल्ली : वृत्तसंस्था (Policenama Online) – 7th Pay Commission | केंद्रीय कर्मचार्‍यांसाठी (Central Government Employee’s) मोठी खुशखबर येत आहे. मोठ्या कालावधीपासून महागाई भत्त्याची (Dearness allowance) प्रतिक्षा आता सप्टेंबर महिन्यात संपणार आहे. सप्टेंबरमध्ये सरकारी कर्मचार्‍यांना वाढलेली सॅलरी येणार आहे.

अगोदर असे समजले जात होते की, वाढलेल्या DA चे पैसे जुलैच्या पगारात येतील परंतु आता हे स्पष्ट झाले आहे की, आता सप्टेंबरच्या अखेरपर्यंत सॅलरीसोबत मागील तीन हप्तेसुद्धा येतील.

सुमारे 52 लाख केंद्रीय कर्मचारी आणि 60 लाख केंद्र सरकारच्या पेन्शनधारकांना दुसर्‍यांदा महागाई भत्ता (DA) आणि महागाई मदत (DR) ची प्रतिक्षा आहे. सप्टेंबरच्या वेतनात किती पैसे तुमच्या सॅलरीत वाढून येतील जाणून घेवूयात…

 

कसा कॅलक्युलेट होणार DA?

तुमची सॅलरी किती वाढेल हे जाणून घेण्यासाठी तुम्हाला तुमची बेसिक सॅलरी चेक करावी लागेल. सोबतच यानंतर सध्याचा DA जाणून घ्यावा लागेल. सध्या तो 17 टक्के आहे जो नवीन DA दिल्यानंतर 28% होईल. यासाठी मासिक DA 11% वाढेल. यामुळे केंद्र सरकारच्या कर्मचार्‍यांचा DA 1 जुलै 2021 पासून त्यांच्या मूळ वेतनाच्या 11% पर्यंत वाढेल. DR च्या कॅलक्युलेशनमध्ये सुद्धा हाच फॉर्म्यूला लागू होईल.

 

उदाहरणाद्वारे समजून घ्या

7वा वेतन आयोग (7th Pay Commission) अंतर्गत सॅलरी कॅलक्युलेशनसाठी समजा की कर्मचार्‍याची बेसिक सॅलरी 20,000 रुपये आहे तर त्याचा मासिक DA 20,000 चा 28% पर्यंत वाढेल.

याचा अर्थ आहे की, मासिक DA मध्ये वाढ 20,000 रुपयांच्या 11% म्हणजे एकुण 2200 रुपये असेल. अशाप्रकारे केंद्र सरकारचे इतर कर्मचारी ज्यांच्या 7व्या सीपीसी पे मॅट्रिक्समध्ये वेगवेगळे मासिक मूळ वेतन आहे, ते हे तपासू शकतात की, डीए दिल्यानंतर त्यांचे वेतन किती वाढेल.

 

किती मिळणार एरियर?

नॅशनल कौन्सिल ऑफ JCM चे शिव गोपाळ मिश्रा यांनी म्हटले की,
क्लास 1 च्या अकिधार्‍यांचा DA एरियर 11,880 रुपयांपासून 37,554 रुपयांच्या दरम्यान होईल.
त्यांनी म्हटले की जर लेव्हल-13 म्हणजे 7वे CPC मूळ वेतनमान 1,23,100 रुपयांनी 2,15,900 रुपये लेवल-14 च्या वेतनमानासाठी गणना केली गेली
तर केंद्र सरकारच्या एका कर्मचार्‍याचा DA देणे 1,44,200 रुपये ते 2,18,200 रुपयांच्या दरम्यान असेल.

Web Titel :- 7th pay commission central government employees can get da dr hike salary on september check details

Join our WhatsApp GroupTelegramfacebook page and Twitter for every update

 

हे देखील वाचा

Delta Variant | ‘या’ 5 प्रकारच्या लोकांना आहे ’डेल्टा व्हॅरिएंट’चा जास्त धोका, व्हायरसपासून वाचण्यासाठी करा ‘ही’ 8 कामे; जाणून घ्या

स्मार्टफोन चोरीला गेला तर सर्वप्रथम करा ‘ही’ 4 कामे, अन्यथा होऊ शकते मोठे नुकसान; जाणून घ्या

Pune News | पुण्याच्या बिबवेवाडीत हॉटेलला भीषण आग; अग्निशमन दलाकडून आग विझविण्याचे काम सुरु

स्वत:ला महाशक्ती दर्शवण्याच्या प्रयत्नात चीनच्या एयरफोर्सकडून झाली ‘ही’ मोठी चूक, जगभरात झाले हसू