7th Pay Commission : केंद्रीय कर्मचाऱ्यांसाठी खुशखबर ! महागाई भत्ता 17% पासून वाढून 28% होणार, पगारात वाढ

नवी दिल्ली : वृत्त संस्था – केंद्र सरकारी कर्मचाऱ्यांसाठी ही आनंदाची बातमी असणार आहे. कारण आता लवकरच त्यांच्या महागाई भत्त्यात वाढ होण्याची शक्यता आहे. सरकारच्या या निर्णयाचा फायदा 50 लाखांपेक्षा जास्त कर्मचारी आणि 65 लाखांपेक्षा अधिक निवृत्तीधारकांना होणार आहे.

‘ऑल इंडिया कंज्युमर प्राईस इंडेक्स’च्या डाटा रिलीजनुसार, जानेवारीपासून ते जून 2021 च्या किमान 4 टक्क्यांपर्यंत वाढ होण्याची शक्यता आहे. केंद्रीय कर्मचाऱ्यांच्या महागाई भत्त्यामध्ये 17 टक्क्यांची वाढ होऊन 28 टक्के केला जाऊ शकतो, असा अंदाज आहे. यामध्ये जानेवारी ते जून 2020 पर्यंत महागाई भत्त्यात 3 टक्के वाढ होऊ शकते. तर जुलै ते डिसेंबर 2020 पर्यंत 4 टक्के वाढ आणि जानेवारी ते जून 2021 पर्यंत 4 टक्के वाढ होऊ शकते.

पगारात होणार वाढ

सातव्या वेतन आयोगानुसार, सरकारच्या महागाई भत्त्यात वाढ केल्याने कर्मचाऱ्यांच्या पगारात चांगली वाढ होणार आहे. सध्या महागाई भत्ता बेसिक सॅलरीच्या 17 टक्के आहे. तर यामध्ये वाढ होऊन 17 टक्क्यांहून 28 टक्के झाले तर पगारात मोठी वाढ होणार आहे.

सेवानिवृत्त केंद्रीय कर्मचाऱ्यांनाही फायदा

कोरोना महामारीच्या पार्श्वभूमीवर सरकारने महागाई भत्त्यात वाढ केली नाही. मात्र, आता केंद्र सरकारने सातव्या वेतन आयोगात वाढ करण्याचा निर्णय घेतला आहे. त्यामुळे याचा फायदा सेवानिवृत्त कर्मचाऱ्यांनाही होणार आहे.