7th Pay Commission | खुशखबर ! सरकारी कर्मचाऱ्यांचा पगार वाढणार; जाणून घ्या किती

नवी दिल्ली – 7th Pay Commission | केंद्रीय सरकारी कर्मचाऱ्यांसाठी (Central Government Employees) महत्वाची बातमी समोर येत आहे. महागाई भत्त्यात Dearness Allowance (DA) वाढ करण्याची मागणी पूर्ण झाल्यानंतर आता फिटमेंट फॅक्टरमध्येही (Fitment Factor) वाढ होण्याची शक्यता आहे. मागील बराच काळ यात वाढ करण्याची मागणी केली जात होती. त्यामुळे या मागणीचा विचार केंद्र शासन करणार असून, केंद्रीय कर्मचाऱ्यांच्या पगारात (Increment for Central Government Employees) वाढ होऊ शकते. (7th Pay Commission)

केंद्रीय कर्मचाऱ्यांचा पगार निश्चित करताना, फिटमेंट फॅक्टरची अत्यंत महत्वाची भूमिका असते. या फिटमेंट फॅक्टरमध्ये वाढ झाल्यास पगारात वाढ होते. त्यामुळे यात आता 3.68 टक्क्यांनी वाढ करण्याची मागणी कर्मचाऱ्यांकडून केली जात आहे. सध्या फिटमेंट फॅक्टर (Fitment Factor) 2.57 इतका दिला जात आहे. प्राप्त माहितीनुसार, केंद्र सरकार (Central Government) या फिटमेंट फॅक्टरमध्ये मोठा निर्णय घेण्याची शक्यता आहे. परिणामी केंद्र सरकारी कर्मचाऱ्यांच्या पगारात वाढ होण्याची शक्यता वर्तविली जात आहे. केंद्र सरकारकडून मात्र याबाबत कोणतीही अधिकृत घोषणा केली गेलेली नाही. (7th Pay Commission)

केंद्रीय कर्मचाऱ्यांना सध्या 2.57 फिटमेंट फॅक्टर मिळत आहे. यानुसार त्यांचा मूळ पगार 18 हजार इतका आहे.
आता मागणीनुसार यात जर का वाढ झाली,
तर हा फिटमेंट फॅक्टर 3.68 होऊन मूळ पगार 26 हजार इतका होऊ शकतो. सध्या सुरु असलेल्या फॅक्टरच्या दरानुसार कर्मचाऱ्यांना 18000 x 2.57 = 48,260 एवढा पगार मिळत आहे. तो फिटमेंट फॅक्टर 3.68 झाल्यानंतर, 26000 x 3.68 = 95,680 एवढा होऊ शकतो. त्यामुळे आगामी काळात केंद्र सरकारच्या कर्मचाऱ्यांसाठी आनंदाची वार्ता मिळू शकते.

Web Title :-  7th Pay Commission | central government employees major update on fitment factor salary will increase 7th Pay Commission

Join our WhatsApp GroupTelegramfacebook page and Twitter for every update

हे देखील वाचा

Jitendra Awhad | जितेंद्र आव्हाड आमदारकीचा राजीनामा देणार; ‘या’ कारणामुळे केली घोषणा, जाणून घ्या नेमकं काय घडलं

Pune Crime | गुंड निलेश वाडकर याच्या बायकोविरुद्ध गुन्हा दाखल; तरुणाचे अपहरण करुन जीवे मारण्याचा केला प्रयत्न