7 वा वेतन आयोग : सरकारी नोकरदारांच्या पगारात ‘घसघशीत’ वाढ होणार, मोदी सरकारचा निर्णय

नवी दिल्ली : वृत्तसंस्था – सरकारने नवीन वर्षाच्या मुहूर्तावर केंद्रीय कर्मचाऱ्यांसाठी एक खुशखबर आणली आहे. केंद्रीय कर्मचाऱ्यांसाठी मोदी सरकार 2020 -21 च्या बजेट मध्ये फिटमेंट फॅक्टर आणि किमान वेतनात वाढ करणार असल्याची माहिती मिळाली आहे. वाढीव वेतन आणि भत्त्या बाबत सरकार वेगळा प्रस्ताव यंदाच्या बजेट मध्ये करणार आहे. यासंदर्भात बैठक देखील घेण्यात आली असून, त्यानुसार आता लवकरच आता निर्णय जाहीर होणार असल्याची माहिती मिळाली आहे.

सध्या केंद्रीय कर्मचाऱ्यांसाठी फिटमेंट फॅक्टर 2.57 टक्के आहे. या फिटमेंट फॅक्टरमध्ये 3.68 टक्क्यांनी वाढ करावी, अशी मागणी केंद्रीय कर्मचाऱ्यांकडून केली जात आहे. तसेच यापूर्वीही असे सांगण्यात आले होते की, 2019 पूर्वी फिटमेंट फॅक्टरच्या टक्क्यांत बदल करणार आहे. मात्र, हा बदल झालेला दिसत नाही. मिळालेल्या माहितीनुसार, बजेट मध्ये कर्मचाऱ्यांच्या महागाई भत्त्यात 4 टक्क्यांपर्यंत वाढ करण्यात येणार आहे. त्याचसोबत 7 व्या वेतन आयोगाअंतर्गत पगारात 18 हजार ते 26 हजार रुपयापर्यंत वाढ करण्यात यावी अशी मागणी कर्मचाऱ्यांकडून करण्यात येत आहे.

दरम्यान, सध्या सरकारी सेवेमध्ये 5 वर्षांपेक्षा अधिक काळ काम केले असल्यास केंद्रीय कर्मचार्‍यांना त्यांची ग्रॅज्युटीची रक्कम कर मुक्त मिळणार आहे. Gratuity Act, 1972 नुसार फॅक्टरी,  खाण,  ऑईल फिल्ड्स,  बंदर, प्लॅटेशंस,  रेल्वे कंपनी,  शॉप्स येथील कर्मचार्‍यांना ग्रॅज्युटी दिली जाते. Payment of Gratuity Bill in 2017 मध्ये सरकारने कमेंटमेट केलं आहे. त्यानुसार करमुक्त करण्यात आलेली ग्रॅज्युटी रक्कम 20 लाख इतकी करण्यात आली आहे. मार्च 2018 मध्ये हे विधेयक लोकसभा आणि नंतर राज्यसभेत मंजूर करण्यात आले होते. त्यानंतर हे अंमलात आणण्यात आले आहे.

फेसबुक पेज लाईक करा – https://www.facebook.com/policenama/