7 वा वेतन आयोग : सरकारी नोकरदारांच्या महागाई भत्त्यात वाढ होण्याची दाट शक्यता !

नवी दिल्ली : वृत्तसंस्था – मोदी सरकार सण सणावळ सुरु होण्याआधी केंद्र सरकारमधील कर्मचाऱ्यांना सुखद धक्का देण्याच्या तयारीत आहे. केंद्र सरकार आपल्या कर्मचाऱ्यांना मोठे गिफ्ट देऊ शकते. दसऱ्या आधीच केंद्रीय कर्मचाऱ्यांना DA म्हणजेच महागाई भत्यामध्ये वाढ करुन मिळू शकते. यामुळे ७ व्या वेतन आयोगाचा सुधारणा करण्याची मागणी करणाऱ्या कर्मचाऱ्यांना यांच्याकडून मोठा दिलासा मिळण्याची शक्यता आहे. सध्या महागाई भत्ता १२ % दर ठरवण्यात आला होता परंतू कर्मचाऱ्यांच्या मागणीनंतर आता ५ टक्के वाढवण्याची शक्यता आहे.

केंद्र सरकार दर ६ महिन्याला महागाई भत्त्याची पाहणी करते, याच वर्षी जानेवारीच्या पहिल्या सहामाहीत महागाई भत्यात वाढ करण्यात आली होती. तर दुसऱ्या सहामाहीमध्ये महागाई भत्ता जुलै पासून लागू करण्यात येणार होता मात्र अजूनही हा भत्ता लागू करण्यात आला नाही.

महागाई भत्ताचा हिशोब AICPI इंडेक्सच्या आकड्यानुसार लावण्यात येतो. यंदा मात्र महागाई भत्यात ५ टक्के वाढ करण्याची विचार करण्यात येत आहे. हा महागाई भत्ता शेवटच्या आठवड्यात किंवा दसऱ्याच्या आधी लागू करण्यात येईल.

महागाई भत्याचे फायदे –
लेवल – १ – १८००० – ९००
लेवल – २ – १९९०० – ९९५
लेवल – ३ – २१७०० – १०८५
लेवल – ४ – २५५०० – १२७५
लेवल – ५ – २९२०० – १४६०

हरिवंश तिवारी यांनी यासंबंधित माहिती देताना सांगितले की ५ टक्के वाढीने कमीत कमी ९०० रुपये महिना वाढ होईल. ज्या कर्मचाऱ्यांचे प्रमोशन झाले आहे त्यांच्या बेसिक पे मध्ये वाढ करण्यात आली आहे. त्यांच्यासाठीचा महागाई भत्त्याशी संबंधित हिशोब वेगळा असू शकतो.

आरोग्यविषयक वृत्त