7th Pay Commission | केंद्रीय कर्मचार्‍यांसाठी खुशखबर ! महागाई भत्त्यात (DA) मध्ये 11% वाढ

नवी दिल्ली : 7th Pay Commission | कोरोना संकटादरम्यान मोदी सरकारने केंद्रीय कर्मचार्‍यांना मोठी भेट दिली आहे. केंद्रीय कॅबिनेटच्या बैठकीत केंद्रीय कर्मचार्‍यांच्या महागाई भत्त्यावर लावलेला प्रतिबंध हटवण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. कॅबिनेटने केंद्रीय कर्मचार्‍यांचा महागाई भत्ता म्हणजे डीए (Dearness Allowance) 17 टक्केवरून वाढवून 28 टक्के केला आहे. अशाच प्रकारे डीएमध्ये एकुण 11 टक्केची वाढ झाली आहे. पीएम नरेंद्र मोदी (Narendra Modi) यांच्या अध्यक्षतेखाली बुधवारी झालेल्या कॅबिनेट बैठकीत हा निर्णय घेण्यात आला आहे.(7th Pay Commission)

प्रेस कॉन्फरन्समध्ये केंद्रीय मंत्री अनुराग ठाकुर यांनी कॅबिनेटमध्ये घेण्यात आलेल्या निर्णयांची माहिती दिली. त्यांनी सांगितले की, एकुण बजेट 34 हजार कोटी रुपयांपर्यंत राहील. हा निर्णय 1 जुलैपासून लागू होईल.

इतका येईल डीए (Dearness Allowance)

सॅलरी किती वाढणार हे पाहण्यासाठी बेसिक सॅलरी चेक केली पाहिजे. सोबतच यानंतर आपला
सध्याचा डीए तपासा. सध्या तो 17 टक्के आहे जो आता 28 टक्के झाला आहे. यासाठी मासिक
डीए 11 टक्के वाढेल. यासाठी, केंद्र सरकारच्या (Central Government) कर्मचार्‍याचा डीए 1 जुलै 2021 पासून त्यांच्या मुळ वेतनाच्या 11 टक्केपर्यंत वाढेल. डीआरच्या गणनेवर सुद्धा हा फार्म्युला लागू होईल.

हे देखील वाचा

MPSC Recruitment | ठाकरे सरकारचा मोठा निर्णय ! MPSC मार्फत 15 हजार 511 पदांसाठी लवकरच भरती होणार

Pune Crime | पुण्यात गुण वाढविण्याच्या आमिषाने 12 वी च्या मुलीकडे शरीर सुखाची मागणी; शिक्षकास धो-धो धुतला अन् काढली धिंड (व्हिडीओ)

Maharashtra Unlock | महाराष्ट्रातील निर्बंध शिथिल होणार?

ट्विटर ला देखील फॉलो करा

फेसबुक ला लाईक करा

Web Titel :  7th Pay Commission | central govt employees da increase from 17 to 28 percent has been cleared today by union cabinet

Join our WhatsApp GroupTelegramfacebook page and Twitter for every update