7th Pay Commission : 1 जुलैपासून केंद्रीय कर्मचार्‍यांचा DA होणार 28 % ! जाणून घ्या किती वाढणार सॅलरी?

नवी दिल्ली : वृत्तसंस्था –   केंद्र सरकारने देशातील 52 लाख कर्मचार्‍यांना डीए देण्याची घोषणा केली आहे. सरकारच्या या पावलाने देशातील केंद्रीय कर्मचार्‍यांच्या पगारात मोठी वाढ होईल. केंद्र सरकारच्या घोषणेनुसार, 1 जुलै 2021 पासून केंद्र सरकारी कर्मचार्‍यांना डीएचा लाभ दिला जाणार आहे. ऑल इंडिया कंझ्यूमर प्राईस इंडेक्स (एआयसीपीआय) च्या डेटा रिलीजनुसार, जानेवारीपासून जून 2021 च्या दरम्यान किमान डीएमध्ये 4 टक्केची वाढ केली जाऊ शकते.

डीए लागू केल्यानंतर केंद्रीय कर्मचार्‍यांचा डीए 17 टक्क्यांनी वाढून 28 टक्के होऊ शकतो. यामध्ये जानेवारीपासून जून 2020 पर्यंत डीएमध्ये 3 टक्के वाढ, जुलैपासून डिसेंबर 2020 पर्यंत 4 टक्के वाढ आणि जानेवारीपासून जून 2021 पर्यंत 4 टक्के वाढीचा समावेश आहे.

किती वाढेल पगार?

केंद्राने 1 जुलै 2021 पासून सर्व तीन प्रलंबित डीए हप्त्ये देण्याची घोषणा केली आहे. कोरोना व्हायरस महामारीमुळे सरकारने डीएवर प्रतिबंध लावला होता. डीए वाढल्याने तेवढ्याच प्रमाणात डीआरमध्ये सुद्धा वाढ होईल. महागाई भत्त्यात वाढ झाल्याने केंद्र सरकारच्या रिटायर्ड कर्मचार्‍यांना सुद्धा डीए लागू केला जाईल.

पीएफ आणि ग्रॅच्युएटीत होईल बदल

संभाव्य डीए वाढीचा केंद्र सरकारी कर्मचार्‍यांचा मासिक पीएफ, ग्रॅच्युएटी योगदानावर सुद्धा परिणाम होईल. सीजीएसच्या पीएफ आणि ग्रॅच्युएटीच्या योगदानाची गणना मुळ वेतन अधिक डीएच्या आधारावर केली जाते. 1 जुलै 2021 पासून डीए वाढणार आहे, कर्मचार्‍यांचा मासिक पीएफ आणि ग्रॅच्युएटीच्या योगदानात सुद्धा याचा परिणाम दिसेल. याचा अर्थ असा आहे की पीएफ आणि ग्रॅच्युएटी सारख्या रिटायरमेंट-ओरिएंटेड फंड्समध्ये जास्त पैसे जमा होतील.