7 वा वेतन आयोग : 10 दिवसाच्या आत केंद्रीय कर्मचार्‍यांना मिळणार मोठं गिफ्ट ! मोदी सरकार DA आणि किमान वेतानावर घेऊ शकतं निर्णय

नवीदिल्ली : वृत्तसंस्था – अर्थसंकल्प सादर करण्यासाठी आता केवळ दहा दिवसांचाच कालावधी बाकी असताना मोदी सरकारकडून केंद्रातील कर्मचाऱ्यांना मोठी भेट दिली जाऊ शकते. महागाई भत्ता आणि किमान वेतन वाढीच्या निर्णयाला सरकार मान्यता देऊ शकते. असे झाल्यास कर्मचार्‍यांचे पगार वाढतील. जर महागाई भत्त्यात चार टक्के वाढ झाली तर कर्मचार्‍यांचे पगार 700 रुपयांवरून 10,000 पर्यंत वाढू शकतात.

त्यातच जर किमान पगार 18,000 रुपयांवरून 26,000 रुपयांपर्यंत वाढविला गेला तर कर्मचार्‍यांच्या पगारामध्ये मोठी वाढ होईल. आता सरकारवर अवलंबून आहे की सरकार अनेक दिवसांपासून केल्या जाणाऱ्या कामगारांच्या या मागण्या कधी पूर्ण करणार. जर आत्ता डीए बाबत कोणताही निर्णय घेण्यात आला नाही तर मार्च महिन्यात यासंबंधी निर्णय घेतला जाऊ शकतो.

डीएमध्ये 4 टक्क्यांनी देखील वाढ केली जाऊ शकते कारण नोव्हेंबर 2019 चा ग्राहक निर्देशांक डेटा आलेला आहे आणि त्यात वाढ होऊन तो 328 वर पोहचला आहे. त्यामुळे सरकार डीएमध्ये चार टक्क्यांनी वाढ करू शकते असे सांगण्यात येत आहे.

मिळालेल्या माहितीनुसार सरकारच्या या घोषणेनंतर डीए 17 % नि वाढून 21 % होईल. केंद्र सरकार मार्च महिन्यात या बाबतची घोषणा करू शकते. लेव्हल एक मधील कर्मचार्‍यांच्या डीएमध्ये चार टक्क्यांची वाढ म्हणजे किमान 720 रुपयांवरून 10,000 पर्यंत वाढू शकते. त्याचबरोबर रेल्वे कर्मचाऱ्यांचे पगार 5000 रुपयांवरून 21000 रुपयांपर्यंत वाढू शकतात.

फेसबुक पेज लाईक करा –