7th Pay Commission DA | केंद्रीय कर्मचाऱ्यांना मोदी सरकारकडून मोठे ‘फेस्टिव्हल गिफ्ट’, महागाई भत्त्यात (DA) 4 टक्क्यांनी वाढ

नवी दिल्ली : वृत्तसंस्था – 7th Pay Commission DA | केंद्र सरकारच्या कर्मचाऱ्यांसाठी (Central Government Employees) मोठ्या आनंदाचा क्षण आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी (PM Narendra Modi) यांच्या अध्यक्षतेखाली केंद्रीय मंत्रिमंडळाने (Union Cabinet) बुधवारी (दि.28) महागाई भत्त्यात (7th Pay Commission DA) 4 टक्के वाढीची घोषणा केली आहे. या निर्णयाचा फायदा सुमारे 1.16 लाख सरकारी कर्मचारी आणि पेन्शनधारकांना (Pensioners) होणार आहे. विशेष म्हणजे केंद्र सरकारने आपल्या कर्मचाऱ्यांना 18 महिन्यांपासून म्हणजे 1 जानेवारी 2020 ते 30 जून 2021 या कालावधीत डीए दिलेला नाही.

34 वरुन 38 टक्के महागाई भत्ता

सरकारने यापूर्वी मार्च महिन्यात केंद्रीय कर्मचाऱ्यांच्या डीएमध्ये (7th Pay Commission DA) 3 टक्क्यांनी वाढ केली होती. 1 जानेवारी 2022 पासून याची अंमलबजावणी करण्यात आली होती. या वाढीनंतर कर्मचाऱ्यांचा महागाई भत्ता 31 टक्क्यावरुन 34 टक्के इतका झाला होता. आता यात पुन्हा एकदा 4 टक्क्यांनी वाढ केली आहे. त्यानंतर आता कर्मचाऱ्यांना मिळणाऱ्या डीएची टक्केवारी 38 टक्के इतकी झाली आहे. याचा थेट परिणाम कर्मचाऱ्यांना मिळणाऱ्या पगारावर होणार आहे. डीएची वाढलेली रक्कम यंदाच्या जुलैपासून लागू होणार असून मागील महिन्यांची थकबाकी देखील कर्मचाऱ्यांना दिली जाणार आहे.

गेल्यावर्षी 11 टक्के वाढला महागाई भत्ता

गेल्या वर्षी जुलैमध्ये मोदी सरकारने (Modi Government) कर्मचाऱ्यांच्या महागाई भत्त्यात एकरक्कमी 11 टक्क्यांनी वाढ केली होती. यानंतर प्रभावी महागाई 17 टक्क्यांवरुन थेट 28 टक्के केली. कोरोनाच्या काळात सरकारने महागाई भत्ता रोखून ठेवला होता. जो गेल्या वर्षी जुलैमध्ये जारी करण्यात आला होता. सरकारने जानेवारी 2020, जुलै 2020 आणि जानेवारी 2021 साठीचा महागाई भत्ता राखून ठेवला होता.

किती वाढणार पगार

चार टक्के डीए वाढीमुळे कर्मचाऱ्यांच्या पगारात 720 रुपयांची वाढ होते.
उदा. जर केंद्र सरकारच्या कर्मचाऱ्याचा मूळ पगार 18 हजार रुपये असेल, तर 34 टक्क्यांनुसार त्याला 6120 रुपये डीए मिळेल.
पण आता 4 टक्के वाढीसह डीए 38 टक्के झाल्यावर कर्मचाऱ्यांना 6840 रुपये मिळतील.
म्हणजे त्याला 720 रुपये अधिक मिळतील.

Web Title :- 7th Pay Commission DA | 7th pay commission update modi government increase dearness allowance da by 4 percent

Join our WhatsApp GroupTelegramfacebook page and Twitter for every update

हे देखील वाचा

BJP On Shivsena | मराठी माणसाचा उत्सव पाहून मळमळतंय…मग घ्या ना धौती योग; शिवसेनेवर भाजपाची टीका

Ashish Shelar | ‘ज्यांना मुंबईतील रस्त्यावरील बुजवता येत नाही खड्डे, त्यांना विद्यापीठांचे कशाला करायचे होते राजकीय अड्डे!’, आशिष शेलारांचा शिवसेनेला टोला

Kitchen Hacks | कोथिंबीर फ्रिजमध्ये ठेवूनही सुकते का? ‘या’ 4 पद्धतीने फ्रेश राहतील भाज्या