7th Pay Commission : खशुखबर ! केंद्रीय कर्मचार्‍यांना आणि पेन्शनधारकांच्या वेतनात वाढ होण्याची दाट शक्यता

पोलिसनामा ऑनलाईन – कोरोना विषाणूच्या महामारीमुळे होणाऱ्या आर्थिक अडचणींचा सामना करण्यासाठी केंद्रीय कर्मचाऱ्यांना मदत होऊ शकते: कारण केंद्रीय कर्मचाऱ्यांना लवकरच चांगली बातमी मिळू शकेल. कोरोना संकटामुळे केंद्र सरकारने या कर्मचाऱ्यांचा महागाई भत्ता कमी केला होता: मात्र आता अशी आशा आहे की जानेवारी २०२१ ते जून २०२१ पर्यंत चा महागाई भत्ता म्हणजे डीएमध्ये (DA) वाढ केली जाऊ शकते. रिपोर्टनुसार, लवकरच केंद्रीय कर्मचाऱ्यांना वाढीव पगार मिळणार आहेत. तसेच, पेन्शनधारकांनाही काहीसा डीएबाबत दिलासा मिळू शकतो.

कोरोना महामारीच्या पार्श्वभूमीवर सरकारने गेल्यावर्षी महत्त्वपूर्ण निर्णय घेत तिचा आधीचा रेट (१७ टक्के) जून २०२१ लागू करण्याची घोषणा केली. जुलै ते डिसेंबर २०२० या कालावधीत अतिरिक्त चार टक्के डीए अजूनही कर्मचाऱ्यांच्या मासिक पगारामध्ये जमा करण्यात आला नाही. हेच कारण आहे की सध्याच्या डीए दर २१ टक्के आहे. परंतु, चार टक्के कमी मिळत आहे. अशा परिस्थितीत सरकार कर्मचाऱ्यांना होळी सणाच्या आसपास त्याची भेट देऊ शकेल, अशी अपेक्षा कर्मचारी आणि निवृत्तीवेतन धारकांना आहे. सरकारच्या या घोषणेचा फायदा ५० लाख कर्मचारी आणि ६१ लाख पेन्शन धारकांना होणार आहे.

ACPI च्या आकडेवारीनुसार नरेंद्र मोदी सरकार जानेवारी ते जून २०२१ कालावधीत चार टक्के डीए ची घोषणा करू शकते याचा अर्थ असा आहे की ते जाहीर झाल्यानंतर कर्मचाऱ्यांचा डीए मूळ मासिक पगारामध्ये (१७+४+४) म्हणजेच एकूण च्या २५ टक्के पर्यंत वाढू शकतो. सातव्या वेतन आयोगानुसार हे जाहीर होताच केंद्र सरकारच्या कर्मचाऱ्यांचा प्रवास भत्ता (Travel Allowance )आपोआप वाढेल अशा परिस्थितीत डीएच्या घोषणेनंतर केंद्र सरकारच्या कर्मचाऱ्यांच्या मासिक वेतनात अनेक पटींनी वाढ होईल. केंद्र सरकारचे कर्मचारी आणि पेन्शनधारक आतुरतेने या बातमीची वाट पाहत आहेत.