7th pay commission : सेवानिवृत्त जवानांना मिळणार जास्तीचं पेन्शन, ‘एवढ्या’चा होणार फायदा

नवी दिल्ली : सातव्या वेतन आयोगानुसार सरकारने माजी सैनिकांना मोठी भेट देण्याची तयारी केली असून त्यांच्या पेन्शनमध्ये बदल करून ती वाढवण्याचा निर्णय घेतला आहे. सरकारच्या या निर्णयामुळे २००६ पूर्वी निवृत्त झालेल्या सैनिक व अधिकाऱ्यांच्या निवृत्तीवेतनात वाढ होणार आहे. हे ते निवृत्तीवेतनधारक आहेत ज्यांना ६५००-१०५०० रुपयांच्या वेतनश्रेणीसाठी ५ व्या सीपीसी (५ व्या वेतन आयोग) अंतर्गत पेन्शन मिळत होती. हा बदल १ जानेवारी २०१६ पासून लागू होणार असून केंद्रीय व राज्य कर्मचार्‍यांना देखील याच तारखेपासून ७ वा वेतन आयोग लागू आहे.

१७ हजारांपेक्षा कमी पगार असणाऱ्यांना मिळणार लाभ :
अखिल भारतीय ऑडिट अँड अकाउंट्स असोसिएशनचे सहायक सरचिटणीस हरिशंकर तिवारी यांनी एका वृत्तवाहिनीला सांगितल्यानुसा निवृत्तीच्या वेळी ज्यांचा पगार महिन्यात १७ हजार रुपयांपेक्षा कमी असेल अशा पेन्शनधारकांना त्याचा फायदा होईल.

जुलै २०१९ मध्ये केंद्र सरकारच्या कर्मचारी विभागाने हा आदेश जारी केला होता. यानंतर, प्रयागराज स्थित प्रधान लेखा नियंत्रक (निवृत्तीवेतन) यांनी संरक्षण विभागात हा आदेश लागू करण्यास सांगितले आहे. या नवीन बदलामध्ये निवृत्तीवेतनासह कौटुंबिक पेन्शनचा समावेश आहे. यामध्ये ४६०० रुपये ग्रेड पेला संबंधित ग्रेड पे मानला गेला आहे. ही दुरुस्ती ५ व्या वेतन आयोगाच्या वेतनात सेवानिवृत्त झालेल्या निवृत्तीवेतनधारकांसाठी आहे.

पेंशनचे नवीन टेबल लागू :
कार्मिक विभागाने ‘नॅशनल पेंशन कॉनकार्डन्स टेबल’ देखील जारी केले होते. टेबल मध्ये निर्धारित केल्यानुसार वैयक्तिक पेंशन / फॅमिली पेंशनसाठी निर्धारित ग्रेड पे ४२०० इतका होता. यात आला वाढ झाली असून रिवाइज्ड पेंशनही दिली आहे.

सर्व विभागांना लागू करण्याचे आदेश :
प्रयागराज स्थित प्रिन्सिपल कंट्रोलर ऑफ डिफेंस काउंट्सने (पेन्शन) सर्व सैन्याच्या विंगना १ जानेवारी २०१६ पासून हे बदल लागू करण्याचे निर्देश दिले गेले आहेत.