7th Pay Commission : केंद्रीय कर्मचाऱ्यांसाठी ‘अप्रेजल फॉर्म’ जमा करण्याच्या मुदतीत वाढ

नवी दिल्ली : वृत्तसंस्था –  केंद्र सरकारच्या कर्मचाऱ्यांसाठी मोठी बातमी आहे. कोरोनाच्या पार्श्वभूमीवर अप्रेजल फॉर्म जमा करण्याची तारीख वाढवली आहे. केंद्र सरकारने आर्थिक वर्ष 2020-21 साठी सेंट्रल स्टेनोग्राफर्स सर्व्हिस (CSS), सेंट्रल सेक्रिटेरिएट स्टेनोग्राफर्स सर्व्हिस (CSSS) आणि सेंट्रल सेक्रिटेरिएट क्लर्कियल सर्व्हिस (CSCS) कॅडरच्या ग्रुप A, B आणि C साठीच्या केंद्रीय कर्मचाऱ्यांसाठी अप्रेजल फॉर्म जमा करण्यास मुदत वाढ दिली आहे.

डिपार्टमेंट ऑफ पर्सनल अँड ट्रेनिंगने एक प्रेस रीलिज जारी केली आहे. यामध्ये दिलेल्या माहितीनुसार, कोरोना व्हायरसच्या पार्श्वभूमीवर या कॅडेर्सचे ग्रुप ए, बी आणि सी च्या कर्मचाऱ्यांसाठी अप्रेजलची तारीख वाढवण्यात आली आहे. या प्रेस रीलीजमध्ये देण्यात आलेल्या माहितीनुसार अप्रेजल अर्थात पगारवाढीची सर्व कामं 31 डिसेंबर 2021 पर्यंत पूर्ण केली जातील. अप्रेजलची नवीन डेडलाईन सर्व सध्याचे कर्मचारी आणि 28 फेब्रुवारी 2021 नंतर निवृत्त होणाऱ्या कर्मचाऱ्यांसाठी लागू असेल. सातव्या वेतन आयोगातील शिफारशीनुसारच केंद्रीय कर्माचाऱ्यांना पगार मिळत आहे. याअंतर्गत कर्मचाऱ्यांचा DA जून 2021 मध्ये वाढू शकतो.

नवीन तारखांनुसार सेंट्रल स्टेनोग्राफर्स सर्व्हिस (CSS), सेंट्रल सेक्रिटेरिएट स्टेनोग्राफर्स सर्व्हिस (CSSS) आणि सेंट्रल सेक्रिटेरिएट क्लर्कियल सर्व्हिस (CSCS) कॅडरच्या ग्रुप A, B आणि C साठीच्या कर्मचाऱ्यांसाठी अप्रेजल फॉर्म 31 मे पर्यंत मिळणार आहे. दरम्यान, सेल्फ अप्रेजल फॉर्म 30 जून 2021 पर्यंत जमा करावा लागेल. रिपोर्टिंग ऑफिसर हा फॉर्म पडताळून पाहून तो रिव्ह्यूइंग ऑफिसरकडे 31 जुलैपर्यंत पाठवतील.

जूनमध्ये DA वाढीची घोषणा

केंद्रीय कर्मचाऱ्यांसाठी सातव्या वेतन आयोगानुसार मिळणारा महागाई भत्ता जानेवारीपासून थांबला आहे. दरम्यान कर्मचाऱ्यांना याकरता आता जास्त वाट पहावी लागणार नाही, अशी शक्यता आहे. केंद्र सरकार जूनमध्येच DA मध्ये वाढीची घोषणा करु शकते. नॅशनल काउंसिल – JCM- स्टाफ साइडने याबाबत माहिती दिली आहे. महागाई भत्ता वाढल्यास केंद्रीय कर्मचाऱ्यांच्या पगारात साधारण चार टक्क्यांनी वाढ होऊ शकते. JCM- स्टाफ साइड सेक्रटरी शिवा गोपाल मिश्रा यांनी दिलेल्या माहितीनुसार केंद्र सरकार जून मध्ये महागाई भत्त्यातील वाढीची घोषणा करु शकते.