7th Pay Commission | केंद्रीय कर्मचारी-पेन्शनधारकांना खुषखबर, मोदी सरकारने वाढवला 4 टक्के DA

नवी दिल्ली : वृत्तसंस्था – 7th Pay Commission | मोदी सरकारने (Modi Government) केंद्रीय कर्मचारी (Central Employees) आणि पेन्शनधारकांसाठी (Pensioners)मोठी घोषणा केली आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या मंत्रिमंडळ बैठकीत डीए (महागाई भत्ता – Dearness Allowance) 4 टक्क्यांनी वाढवण्याचा निर्णय घेतला आहे. त्यामुळे सरकारी कर्मचाऱ्यांचा महागाई भत्ता 38 टक्क्यांवरुन 42 टक्क्यांवर (7th Pay Commission) गेला आहे. मोदी सरकारने घेतलेल्या या निर्णयामुळे देशभरातील कोट्यवधी सरकारी कर्मचारी आणि पेन्शनरधारकांना फायदा होणार आहे. केंद्र सरकार प्रत्येक वर्षी मार्च महिन्यात डीए मध्ये वाढ करत असते.
केंद्रीय कर्मचाऱ्यांचा महागाई भत्ता आणि पेन्शनधारकांच्या महागाई सवलतीत वाढ करण्याचा निर्णय 1 जानेवारी 2023 पासून लागू केला जाणार आहे. कर्मचारी आणि पेन्शनधारकांसाठी महागाई भत्ता (DA) आणि महागाई सवलत वाढवण्याच्या निर्णयानंतर सरकारच्या तिजोरीवर वार्षीक 12,815.60 कोटी रुपयांचा भार पडणार आहे. सरकारच्या या निर्णयाचा फायदा 47.58 लाख कर्मचारी आणि 69.76 लाख पेन्शनधारकांना होणार आहे. ही वाढ सातव्या वेतन आयोगाच्या (7th Pay Commission) शिफारशींच्या आधारे केल्याचे सूत्रांनी सांगितले.
महागाई भत्ता वाढल्याने केंद्रीय कर्मचाऱ्यांचा पगार वाढणार आहे. तसेच पेन्शनधारकांच्या पेन्शनमध्येही वाढ
होणार आहे. किती पैसे वाढणार हे उदाहरणासह समजून घ्या… जर एखाद्या कर्मचाऱ्याचा बेसीक पगार 25,500
रुपये एवढा आहे. सध्याच्या 38 टक्क्यांच्या डीए नुसार त्याला 9690 रुपये मिळतात. जर डीए 42 टक्के झाला
तर महागाई भत्ता 10, 710 रुपये होईल. म्हणजे प्रत्येक महिन्याला 1020 रुपये वाढीव वेतन मिळेल.
Govt hikes DA by 4 pc to 42 pc for central govt employees: I&B Minister Anurag Thakur
— Press Trust of India (@PTI_News) March 24, 2023
Web Title :- 7th Pay Commission | Good news for central employee-pensioners, Modi government has increased DA by 4 percent
Join our WhatsApp Group, Telegram, facebook page and Twitter for every update