home page top 1

7 वा वेतन आयोग : दिवाळीनंतर सरकारी नोकदारांच्या पगारीत वाढ होण्याची शक्यता

नवी दिल्ली : वृत्तसंस्था – केंद्र सरकारच्या कर्मचाऱ्यांसाठी महत्वाची बातमी आहे. केंद्र सरकारच्या सातव्या वेतनाच्या आयोगाच्या शिफारसीनुसार कर्मचाऱ्यांच्या वेतनाबाबत निर्णय घेण्यात येणार आहे. त्यामुळे दिवाळीनंतर नोव्हेंबर महिन्यात केंद्रीय कर्मचाऱ्यांना त्यांच्या वेतनात वाढ करण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे. गेल्या काही काळापासून केंद्रीय कर्मचाऱ्यांना पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या सरकारकडे बेसिक सॅलरीमध्ये वाढ करण्याची मागणी करण्यात येत आहे.

सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, सध्या कर्मचाऱ्यांना देण्यात येणारे किमान वेतन 18 हजार ते 8 हजार रुपयांनी वाढू शकते. सरकारच्या आदेशानंतर केंद्रीय शासकीय कर्मचाऱ्यांना 26 हजार प्रति महिना किमान वेतन मिळू शकते.

सध्या शासकीय कर्मचाऱ्यांना बेसिक सॅलरी 18 हजार रुपये प्रति महिना देण्यात येते. मात्र कर्मचारी सरकारकडे बेसिक सॅलरीमध्ये वाढ (फिटमेंट फॅक्टर मध्ये 3.68 टक्क्यांनी ) करण्याची मागणी करत आहेत. त्यामुळे जर सरकारने कर्मचाऱ्यांच्या फिटमेंट फॅक्टरमध्ये 3.68 टक्क्यांनी वाढ केल्यास त्यांनी बेसिक सॅलरी 26 हजार रुपये प्रति महिना होणार आहे.

Visit : Policenama.com

Loading...
You might also like