7th Pay Commission : सरकारी कर्मचार्‍यांचा वाढणार पगार ! मोदी सरकारने घेतला ‘हा’ महत्वाचा निर्णय

नवी दिल्ली : वृत्तसंस्था –  कोरोना व्हायरस महामरीच्या दरम्यान सरकारी कर्मचार्‍यांनी ज्याप्रकारे जबाबदारीसह आपले कर्तव्य पार पाडले आहे, ते पाहता सरकार त्या कर्मचार्‍यांचा पगार वाढवण्याचा विचार करत आहे.

याच कारणामुळे सरकारी कर्मचार्‍यांच्या चांगल्या कामाची दखल घेऊन नरेंद्र मोदी सरकारने त्यांना भेट दिली आहे. बजेटमध्ये अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी घोषणा केली होती की, सरकारी कर्मचार्‍यांना आता लीव्ह ट्रॅव्हल कन्सेशन (एलटीसी) कॅशवर इन्कम टॅक्स द्यावा लागणार नाही.

डीएनए इंडिया रिपोर्टनुसार, आपल्या बजेट भाषणात अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी म्हटले की, एलटीसीला कोविड-19 महामारीमुळे कर सवलतीत ठेवले आहे. अर्थमंत्र्यांनी म्हटले की, आशा आहे की या योजनेने सरकारी कर्मचार्‍यांच्या खिशात आणखी पैसा येईल. स्पष्ट आहे की, पैसा आल्यानंतर कर्मचारी बाजारात खर्च करतील, ज्यामुळे देशाच्या अर्थव्यवस्थेला फायदा होईल.

एलटीसी योजनेची घोषणा मागच्या वर्षी 12 ऑक्टोबरला करण्यात आली होती. अगोदर ही योजना केवळ केंद्रीय कर्मचार्‍यांसाठी होती परंतु नंतर खासगी आणि अन्य राज्य कर्मचार्‍यांना सुद्धा या योजनेत सहभागी करण्यात आले होते. सरकारने म्हटले की, जे कर्मचारी कोरोना व्हायरसमुळे एलटीसीचा लाभ घेऊ शकले नाहीत, त्यांना प्रवास भत्ता सुटी योजनेत रोख व्हाऊचर योजनेचा लाभ दिला जाईल.

केंद्र सरकारच्या कर्मचार्‍यांना 4 वर्षात लीव्ह ट्रॅव्हल कन्सेशन (एलटीसी) मिळते. या भत्त्याद्वारे कर्मचारी देशात कुठेही प्रवास करू शकतात. या 4 वर्षाच्या कालावधी दरम्यान केंद्रीय कर्मचार्‍याला दोनवेळा आपल्या घरी जाण्याची संधी मिळते. या प्रवास भत्त्यात कर्मचार्‍याला 10 दिवसाच्या पीएल (विशेषाधिकार सुट्टी) सह विमान प्रवास आणि रेल्वे प्रवासाचा खर्च मिळतो.

नरेंद्र मोदी सरकार लवकरच डीएवर सुद्धा घेणार निर्णय

कोरोना व्हायरस महामारीदरम्यान मोदी सरकारने कर्मचार्‍यांच्या डीएमध्ये वाढ रोखली होती. परंतु, आता असे मानले जात आहे की, सरकार डीएबाबत पुन्हा एकदा महत्वाचा निर्णय घेऊ शकते. एआयसीपीआय (अखिल भारतीय ग्राहक मूल्य निर्देशांक) जारी झाल्यानंतर, हे जवळपास नक्की आहे की, अंदाचे 4 टक्के डीए वाढवला जाईल. सोबतच जुना डीए वेतनात एरियर म्हणून दिला जाईल. म्हणजेच, लवकरच सरकारी कर्मचार्‍यांना जास्त पैसे मिळणार आहेत.