खुशखबर ! नवं सरकार स्थापन झाल्यानंतर ‘या’ सरकारी कर्मचाऱ्यांच्या पगारात होणार वाढ

मुंबई : पोलिसनामा ऑनलाईन – लोकसभा निवडणुकीचे निकाल आल्यानंतर केंद्र सरकारच्या कर्मचाऱ्यांना मोठी खुशखबर मिळणार आहे. नवीन सरकार सत्तेवर आल्यानंतर लगेच केंद्रीय कर्मचाऱ्यांच्या भत्त्यात आणि पगारात वाढ केली जाणार आहे. यासंबंधी सरकारने घोषणा केली आहे, मात्र याची अंमलबजावणी निवडणूक निकालानंतर केली जाणार आहे. सरकारी कर्मचाऱ्यांसाठी कमीत कमी पगारात वाढ करण्याची आशा मंत्रिमंडळाच्या बैठकीत निर्माण झाली होती. आचारसंहिता लागू झाल्यामुळे हा निर्णय लांबणीवर पडला होता. यामध्ये कमीतकमी १८ हजार ते जास्तीत जास्त २६ हजार रुपयांपर्यंत वाढ करण्याची घोषणा करण्यात आली आहे.

वेगवेगळ्या टप्प्यात होईल वाढ

एक साथ हि पगारवाढ होणार नसून वेगवेगळ्या टप्प्यांत यामध्ये वाद केली जाण्याची शक्यता आहे. कमीत कमी पगार असलेल्या कर्मचाऱ्यांची हि पगारवाढ करण्यात येणार आहे.

या कर्मचाऱ्यांचा वाढणार पगार

जवळजवळ ९ लाख केंद्रीय कर्मचाऱ्यांच्या पगारात वाढ होऊ वाढू शकते ही पगारवाढ सीमा सुरक्षा दल (BSF), केंद्रीय औद्योगिक सुरक्षा दल ( CISF ), ITBP, SSB, भारतीय रेल्वे कर्मचारी, आयटीएस यांना लागू होणार असल्याची माहिती आहे.