7th Pay Commission : केंद्रीय कर्मचार्यांना सरकारने दिला झटका ! जुलैमध्ये वाढणार नाही TA, जाणून घ्या केव्हा वाढेल सॅलरी
नवी दिल्ली : केंद्रीय कर्मचार्यांसाठी वाईट बातमी आहे… जर तुम्ही सुद्धा महागाई भत्ता आणि प्रवास भत्ता वाढण्याची वाट पहात असाल तर आता तुम्हाला यासाठी आणखी वाट पहावी लागणार आहे. कोरोना काळात सरकारने टीए आणि डीए मध्ये वाढ करण्याचा निर्णय पुढे ढकलला आहे. सध्या सर्व कर्मचार्यांना जुन्याच दराच्या हिशेबाने महागाई भत्ता दिला जाईल. रिपोर्टनुसार, केंद्र सरकारच्या कर्मचार्यांचा महागाई भत्ता 1 जुलै 2021 पर्यंत वाढवला जाणार नाही.
काही दिवसांपूर्वी अर्थ राज्यमंत्री अनुराग ठाकुर यांनी याबाबत माहिती दिली होती की, केंद्रीय कर्मचार्यांना महागाई भत्ता जुलै 2021 पर्यंत वाढवला जाईल. मनी कंट्रोलच्या वृत्तानुसार, सरकारने सध्या कोरोना काळात कोणत्याही प्रकारची वाढ स्पष्टपणे नाकारली आहे. म्हणजे यावर्षी जुलैमध्ये भत्त्यात वाढ होणार नाही.
सध्या मिळतोय 17 टक्के डीए
सध्या केंद्रीय कर्मचार्यांना 17 टक्के डीए दिला जात आहे, जो वाढवून 28 टक्के करण्याचे वृत्त होते. अगोदर वृत्त होते की, केंद्र सरकार जुलै 2021 मध्ये भत्ता वाढवून 28 टक्के करणार.
सोबत वाढतो टीए आणि डीए
याशिवाय सरकारच्या तरतुदीनुसार, कर्मचार्यांचा ट्रॅव्हल अलाऊंन्स सुद्धा डीएसोबत वाढवला जातो. डीए आणि टीएमधील वाढीनंतर केंद्रीय कर्मचार्यांच्या पगारात सुद्धा वाढ होईल.