7 वा वेतन आयोग : 12 वी पास उमेदवारांसाठी सरकारी नोकरीची सुवर्णसंधी, जाणून घ्या

पोलीसनामा ऑनलाइन टीम  –  12 पास तरुणांसाठी हरियाणा कर्मचारी निवड आयोगात सरकारी नोकरी (Government Job) मिळण्याची सुवर्णसंधी आहे. हरियाणातील पोलीस विभागात तब्बल 7, 298 पोलीस हवालदार पदाची भरती केली जाणार आहे. त्यासाठी हरियाणा कर्मचारी निवड आयोगाने अर्ज मागविले आहेत. इच्छुक आणि पात्र उमेदवारांना 10 फेब्रुवारी 2021 पर्यंत अर्ज करता येणार आहे. 11 जानेवारी 2021 पासून अर्ज प्रक्रिया सुरू झाली आहे.

पोलीस हवालदार पदासाठी अर्ज करताना उमेदवार 12 वी पास आणि 10 वीच्या इयत्तेत हिंदी किंवा संस्कृत विषय असणे अनिवार्य आहे. तसेच किमान वयोमर्यादा 18 वर्षे आणि कमाल वयोमर्यादा 25 वर्षे निश्चित केली गेली आहे. वयाची गणना 1 जानेवारी 2021 रोजी नुसार केली जाईल. वरील पदांसाठी पोलीस कॉन्स्टेबल वेतन 21,700 रुपयांवरून 69,100 रुपये निश्चित केले गेले आहे.

पोलीस कॉन्स्टेबल भरती परीक्षा

उमेदवारांची लेखी परीक्षा आणि शारीरिक चाचणी (पीएसटी) च्या आधारे निवड केली जाणार आहे. लेखी परीक्षा उत्तीर्ण झालेल्या उमेदवारांना शारीरिक चाचणी (पीएसटी) द्यावी लागेल. त्यानंतर शारीरिक मोजमाप आणि वजन तपासणी (पीएमटी) करावे लागेल. या भरतीसाठी लेखी परीक्षा 27 आणि 28 मार्च 2021 रोजी घेण्यात येणार आहे. अर्ज करण्यासाठी उमेदवारांना हरियाणा कर्मचारी निवड आयोगाच्या (एचएसएससी) http://www.hssc.gov.in या संकेतस्थळावर जावे लागेल.

पुरुष कॉन्स्टेबल : 5500 पदे
महिला कॉन्स्टेबल : 1100 पदे
एचएपी-दुर्गा -1 साठी महिला कॉन्स्टेबल: 698 पदे