सरकारी नोकरीची सुवर्णसंधी ! पदवीधरांसाठी भरती, 7 व्या वेतन आयोगानुसार पगार, जाणून घ्या

नवी दिल्ली : वृत्तसंस्था –  तुम्ही जर पदवीधर असाल आणि सरकारी नोकरी करत असाल तर तुमच्यासाठी ही महत्वाची बातमी आहे. कारण दिल्ली उच्च न्यायालयात विविध पदांसाठी भरती प्रक्रिया आहे. यात पर्सनल असिस्टेंट आणि जूनिअर जूडिशिअल असिस्टेंट स्तरावरील पदांचा समावेश आहे. यासाठी उमेदवार ऑनलाइन अर्ज करु शकतात. अर्ज करण्याची अंतिम तारीख 6 ऑक्टोबर असणार आहे. निवड होणाऱ्या उमेदवारांना 7 व्या वेतनानुसार पगार मिळेल. 
 
महत्वाच्या तारखा –
अर्ज करण्याची सुरुवात – 16 सप्टेंबर 2019
अर्ज करण्याची अंतिम तारीख – 6 ऑक्टोबर 2019
 
पदाचे नाव –
पर्सनल असिस्टेंट 
पदांची संख्या – 596 
 
वेतनमान –
निवड झालेल्या उमेदवारांना सातव्या वेतनानुसार पगार
अधिकृत वेबसाइट – delhidistrictcourts.nic.in
पात्रता – कोणत्याही मान्यता प्राप्त विद्यापीठातून पदवी
 
वयोमर्यादा –
18 ते 27 वर्षापर्यंतचे उमेदवार या पदांसाठी अर्ज करु शकतात.
कामाचे स्थान –  दिल्ली.
 
परिक्षा शुल्क –
जनरल, ओबीसी, इडब्ल्युएस उमेदवारांसाठी 300 रुपये
एसी, एसटी पीडब्ल्युडी, माजी सैनिक, महिला परिक्षा शुल्क नाही. 
ऑनलाइन पद्धतीने परिक्षा शुल्क भरता येईल. 
You might also like