7th Pay Commission | केंद्रीय कर्मचार्‍यांना आणखी एक भेट ! 28% DA सह मिळेल 27% हाऊस रेंट अलाऊन्सचा (HRA) लाभ; जाणून घ्या

नवी दिल्ली : वृत्तसंस्था 7th Pay Commission News | केंद्रीय कर्मचार्‍यांसाठी खुशखबर आहे. Dearness Allowance वाढीच्या घोषणेनंतर आता केंद्र सरकारने हाऊस रेंट अलाऊंन्स (House Rent Allowance) वाढवून 27 टक्के केला आहे. महागाई भत्त्यानंतर आता HRA (House Rent Allowance) वाढल्याने केंद्रीय कर्मचार्‍यांचा डबल लाभ झाला आहे. 7th Pay Commission मुळं कर्मचार्‍यांना फायदा होत आहे.

केंद्रीय कर्मचार्‍यांना डबल भेट

Dearness Allowance वाढीच्या घोषणेनंतर केंद्र सरकारने हाऊस रेंट अलाऊन्स वाढवून 27 टक्केपर्यंत केला आहे. डिपार्टमेंट ऑफ एक्सपेंडिचरने 7 जुलै 2017 ला एक आदेश जारी केला होता ज्यामध्ये म्हटले होते की, जेव्हा डियरनेस अलाऊन्स 25 टक्केच्या पुढे जाईल तेव्हा हाऊस रेंट अलाऊन्स रिव्हाईज केला जाईल. 1 जुलैपासून डियरनेस अलाऊन्स वाढून 28 टक्के झाला आहे ज्यामुळे हाऊस रेंट अलाऊन्स सुद्धा रिव्हाईज करण्यात आला आहे.

हाऊस रेंट अलाऊन्समध्ये रिव्हीजन

हाऊस रेंट अलाऊन्समध्ये रिव्हीजन नंतर वेगवेगळ्या कॅटगरीसाठी हाऊस रेंट अलाऊन्समध्ये 1-3 टक्केची वाढ केली आहे. ’X’ क्लास सिटीजसाठी HRA बेसिक पेच्या 27 टक्के असेल. त्याच प्रमाणे ’Y’ क्लास सिटीजसाठी 18 टक्के आणि ’Z’ क्लास सिटीजसाठी तो बेसिक पेच्या 9 टक्के असेल. सध्या तिनही क्लाससाठी 24 टक्के, 16 टक्के आणि 8 टक्के आहे.

किती असतो ’हाऊस रेंट अलाऊन्स

ज्या शहराची लोकसंख्या 50 लाखापेक्षा जास्त असते ते ’X’ कॅटेगरीत येतात. तर ज्याची लोकसंख्या 5 लाखापेक्षी जास्त असते ते ’Y’ कॅटेगरीत येतात. आणि 5 लाखापेक्षा कमी लोकसंख्येच्या शहर ’Z’ कॅटेगरीत येते. तिनही कॅटगरीसाठी मिनिमम HRA 5400, 3600 आणि 1800 रुपये असेल. डिपार्टमेंट ऑफ एक्सपेंडिचरनुसार, जेव्हा डियरनेस अलाऊन्स 50 टक्केवर जाईल तेव्हा मॅक्सिमम House Rent Allowance वाढून 30 टक्के होईल.

Web Titel :- 7th-pay commission latest news after da centre hikes house rent allowance know

Join our Whatsapp GroupTelegramfacebook page and Twitter for every update

हे देखील वाचा

MLA Rohit Pawar | जामखेडच्या सतीशला मिळाले नवे आयुष्य ! आ. रोहित पवार यांच्या माध्यमातून मिळाले मोफत उपचार

Ramdas athavle | …शरद पवार निवडून येणार नाहीत, त्यांना बळीचा बकरा करू नये

Social Media News | धोक्याची घंटा ! तुम्ही सुद्धा सोशल मीडियावर करत असाल ‘हे’ काम, तर 24 तासात डिलिट केले जाईल अकाऊंट